EPFO Alert: Know the rules for PF withdrawal after retirement or leaving a job. AI
बिझनेस

EPFO Update : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PF चे पैसे वेळेत न काढल्यास तुमच्या व्यजाचे काय होते? EPFO चा अलर्ट

EPFO Update News : EPFO सदस्यांसाठी महत्त्वाची माहिती! नोकरी सोडल्यानंतर किंवा रिटायरमेंटनंतर PF कधी काढावा? EPF खाते ‘इनऑपरेटिव्ह’ होण्याचे नियम, UAN, KYC आणि PF ट्रान्सफरबाबत जाणून घ्या.

Alisha Khedekar

  • EPFO सदस्यांनी PF खाते नेहमी तपासणे गरजेचे

  • नोकरी बदलल्यानंतर जुना PF नवीन खात्यात ट्रान्सफर करावे

  • UAN, आधार, बँक खाते आणि KYC तपशील अद्ययावत ठेवणे आवश्यक

  • दीर्घकाळ योगदान किंवा व्यवहार न झाल्यास EPF खाते ‘इनऑपरेटिव्ह’ होऊ शकते

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नोकरी सोडलेले किंवा रिटायर झालेले कर्मचारी आपला PF वेळेत काढत नसतील, तर त्यांच्या व्याजाचे काय होते तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्ही PF वेळेत नसाल तर तुमच्या व्याजाचं नुकसान होऊ शकते. याबाबत EPFO ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत ‘इनऑपरेटिव्ह EPF अकाउंट’बाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

EPFO च्या माहितीनुसार, एखादा कर्मचारी वयाच्या ५५ वर्षांपूर्वी रिटायर झाल्यास, त्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत EPF ची रक्कम काढणे आवश्यक आहे. तर ५५ वर्षे किंवा त्यानंतर निवृत्त झालेल्या सदस्यांनी निवृत्तीच्या तारखेपासून तीन वर्षांच्या आत EPF ची रक्कम काढणे अनिवार्य आहे. नोकरी सोडल्यानंतर किंवा EPF खात्यात पैसे येणे बंद झाल्यानंतर नव्याने पैसे जमा होत नसल्यास खाते ‘इनऑपरेटिव्ह’ होऊ शकते. त्यामुळे सदस्यांनी आपले खाते वेळोवेळी तपासणे महत्त्वाचे आहे.

EPFO ने सदस्यांना UAN च्या माध्यमातून EPF खात्यावर नियमित लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तसेच आधार, बँक खाते आणि इतर KYC तपशील अद्ययावत ठेवावेत. नोकरी बदलल्यानंतर PF रक्कम नवीन खात्यात ट्रान्सफर करावी. तसेच रिटायरमेंटनंतर मिळालेल्या मुदतीत PF काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी, असेही EPFO ने स्पष्ट केले आहे.

रिटायरमेंटनंतर केवळ पैसे जमा करणे पुरेसे नसून, तिचे योग्य वेळी व्यवस्थापन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे EPFO सदस्यांनी आपल्या PF खात्याची माहिती नियमितपणे तपासणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

Maharashtra News Live Update: मिरा-भाईंदरमध्ये केमिकलच्या मदतीने नोटा तिप्पट करण्याचे आमिष; तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक आणि धनु राशींना मिळणार नवी संधी; जाणून घ्या आठवड्याचं राशीभविष्य

Tulsi Plant Vastu: सुकलेली तुळस काय संकेत देते? घरातील झाडे सुकण्याचा अर्थ काय?

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

SCROLL FOR NEXT