Maharashtra News Live Update: नायलॉन मांजाविरोधात नागपूर पोलिसांचे अनुकरण करा, हायकोर्टाचे निर्देश

Marathi Breaking Live Headlines Updates : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे अपडेट, टायगर श्रॉफवर गोळीबार प्रकरण, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार, सीजेपी, राज्यासह देशातील हवामानाचे अपडेट, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Pimpari: पिंपरीत डंपर पलटी, दुचाकीचे नुकसान; जीवितहानी टळली

पिंपरीतील अशोक थिएटर रस्त्यावर वाघेरे पार्कसमोर दगडांनी भरलेला डंपर पलटी झाल्याची घटना घडली आहे.

ड्रेनेज चेंबरमध्ये चाक अडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मात्र डंपर आणि जवळ उभ्या असलेल्या सीबीझेड दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

Nagpur: नायलॉन मांजाविरोधात नागपूर पोलिसांचे अनुकरण करा, हायकोर्टाचे निर्देश 

नागपूर

- नायलॉन मांजाविरोधात नागपूर पोलिसांचे अनुकरण करा, हायकोर्टाचे निर्देश

- विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश

- नायलॉन मांजाची पुरवठा साखळी तोडून मूळ स्रोत शोधण्याचे निर्देश दिले

- सिल्वासामधील कारखान्यावर छापा टाकून नागपूर ग्रामीण पोलिसांनी ६ कोटी २६ लाखांचा माल जप्त केला

Delhi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दिल्ली पोलिस मुख्यालयाला भेट देणार

दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज दिल्ली पोलिस मुख्यालयाला भेट देणार

इंडिया आघाडीचा १ नोव्हेंबरला रामलीला मैदानात मार्च आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची

सीजेपी आणि कांग्रेस पक्षाच्या आंदोलनानंतर ही पहिलीच भेट

अमित शाह दुपारी ३ वाजता भेट देणार

राजधानी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार

वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती

Gadchiroli: गडचिरोलीच्या अहेरी बेमुदत ठिय्या आंदोलन,  रस्त्यासाठी आदिवासींचा एल्गार

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

स्वातंत्र्याला 78 वर्षे झाली तरी एक आदिवासी भागात आजही मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहे.

चिरेपल्ली, पत्तीगाव, कोतागुडम, मरणेली आणि खांदला या ग्रामसभांच्या सहकार्याने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

या गावांना जोडणारा खांदला ते चिरेपल्ली आणि चिरेपल्ली ते आलापल्ली हा मुख्य रस्ता तात्काळ करण्यात यावा ही प्रमुख मागणी आहे.

Pune: पुण्यात अवैध हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी महिलेला ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई

पुणे - अवैध हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी महिलेला ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाई

वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

आरोपी महिलेची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com