Electricity Bill Saam Tv
बिझनेस

Electricity Bill: अव्वाच्या सव्वा वीज बिल आलेय? व्हॉट्सअ‍ॅपवरुन २ मिनिटात करा तक्रार, झटक्यात प्रॉब्लेम संपेल

Electricity Bill Complaints on WhatsApp Number: वीजबिल जास्त आलं असेल तर आता तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने तक्रार करण्याची गरज नाही. तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करु शकतात.

Siddhi Hande

वीजबिल जास्त आलंय?

व्हॉट्सअॅपद्वारे करा तक्रार

तक्रार करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

सध्या थंडीचा सीझन आहे. थंडीमध्ये हीटर गिझर यासाठी जास्त वीज वापरली जाते.यामुळे अनेकदा वीजबील जास्त येते. दरम्यान, अनेकदा आपण घरात वीजेचा जास्त वापर केला नसतानाही बिल जास्त येते. त्यामुळे ग्राहकांना खूप त्रास होतो. यामागचे कारण म्हणजे बिलामधील तफावत. जर तुम्हाला विजेचा जास्त वापर केला नसतानाही बिल जास्त आले असेल तर त्याची तक्रार करा. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने तक्रार करु शकतात.

जर वीजबिल चुकीचे आले असेल तर त्याची सरकारी कार्यालयात तक्रार करावी लागायची. यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागयचे. मात्र, आता तुम्हाला फक्त व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करायची आहे. ही प्रोसेस खूप सोपी आहे.

सरकारने ट्विट करत दिली माहिती

ग्राहक व्यव्हार विभागाने अधिकृत एक्स अकाउंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये तुम्हाला हेल्पलाइन किंवा व्हॉट्सअॅप नंबरवर जाऊन संपर्क करण्यास सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, जर तुम्हाला बिलात कोणतीही त्रुटी किंवा किंमतीत तफावत जाणवली तर त्याची तक्रार करा. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर किंवा व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करा.

तुम्हाला हेल्पलाइन नंबर १९१५ किंवा व्हॉट्सअॅप नंबर८८००००१९१५ वर तक्रार करयाची आहे. यामुळे वीज बिलात जर काही चुक असेल ती दुरुस्त करणे सोपे होईल.

व्हॉट्सअॅपद्वारे अशा पद्धतीने करा तक्रार (Electricity bill Online Complaint)

तुम्ही हा नंबर सेव्ह करुन किंवा न सेव्ह करताही तक्रार करु शकतात. व्हॉट्सअॅपवरील न्यू चॅट या ऑप्शनवर क्लिक करा.

तिथे तुम्हाला हा नंबर टाकायचा आहे. यानंतर तुम्हाला हाय असा मेसेज करायचा आहे.

यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन दिसणार आहे. त्यातील तक्रार करा, यावर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती लिहायची आहे आणि तक्रार करायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT