Electric Car: सेकंड-हँड ई-कार घ्यायची आहे? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा, अन्यथा होईल मोठे नुकसान

Second Hand Car Tips: वापरलेली इलेक्ट्रिक कार खरेदी करताना बॅटरी स्थिती, सर्व्हिस रेकॉर्ड, वॉरंटी आणि चार्जिंग इतिहास नीट तपासा. निर्णय घाईत न घेता तज्ञाकडून वाहनाची सखोल तपासणी करून घ्या.
Electric Car: सेकंड-हँड ई-कार घ्यायची आहे? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा, अन्यथा होईल मोठे नुकसान
Published On

आजच्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेल दरांमुळे आणि पर्यावरण जनजागृतीमुळे इलेक्ट्रिक कारचे मागण्या वेगाने वाढत आहे. मात्र, नवीन इलेक्ट्रिक कारच्या उच्च किंमती पाहता अनेक ग्राहक वापरलेल्या कारचा पर्याय निवडत आहेत. पण अशा कार घेण्याआधी काही आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे वापरलेली इलेक्ट्रिक कार खरेदी करताना बॅटरीची स्थिती, मायलेज आणि वॉरंटी यांसारख्या घटकांचा बारकाईने विचार करणे गरजेचे आहे.

ऑनबोर्ड चार्जर

इलेक्ट्रिक कारमध्ये ऑनबोर्ड चार्जर अनेकदा बिघाडाचा मुख्य कारण ठरतो आणि त्याची दुरुस्ती अत्यंत खर्चिक असू शकते. त्यामुळे वापरलेली ईव्ही खरेदी करण्यापूर्वी ऑनबोर्ड चार्जर व्यवस्थित कार्यरत आहे का? याची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे.

Electric Car: सेकंड-हँड ई-कार घ्यायची आहे? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा, अन्यथा होईल मोठे नुकसान
Kia Car Warranty: किआ इंडिया कारची भन्नाट वॉरंटी, आता तुमची कार राहणार जास्त काळ सुरक्षित

एयर, हीट और पंप

इलेक्ट्रिक कारमध्ये पीटीसी हीटर किंवा एअर हीट पंप खराब होण्याची शक्यता जास्त मानली जाते. हा भाग दुरुस्त करणे महागडे ठरते. त्यामुळे वापरलेली इलेक्ट्रिक कार घेताना या युनिटची कार्यक्षमता आणि बदलण्याचा खर्च तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

Electric Car: सेकंड-हँड ई-कार घ्यायची आहे? 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा, अन्यथा होईल मोठे नुकसान
Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

बॅटरी नक्की तपासा

उच्च-व्होल्टेज बॅटरीतील सेल्स कमजोर झाल्यास बॅटरी फेल होऊ शकते आणि बदलण्याची गरज भासू शकते. ही समस्या नेहमी गंभीर नसली तरी जुन्या इलेक्ट्रिक कारमध्ये जास्त दिसते. खर्च मोठा असू शकतो, त्यामुळे खरेदीपूर्वी बॅटरीची स्थिती तपासणे आवश्यक आहे.

गंज तपासा

गंज ही समस्या केवळ इलेक्ट्रिक कारपुरती मर्यादित नाही, तर सर्व वाहनांमध्ये दिसू शकते. कारमध्ये उत्तम रंग आणि धातूचा वापर असल्याने गंज प्रतिरोधकता वाढली आहे. तरीही वाहनाच्या धातूच्या भागांची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक आहे.

टायर

इलेक्ट्रिक कारमध्ये बॅटरी पॅक जड असल्याने टायर्स पारंपरिक कारपेक्षा लवकर झिजतात. त्यामुळे वापरलेली ई-कार खरेदी करण्यापूर्वी टायर्सची स्थिती आणि घासलेले असतील ते नीट तपासणे महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com