Aadhar Card ITR Verify Saam tv
बिझनेस

ITR Verification : आधारकार्डच्या मदतीने घरबसल्या करा इनकम टॅक्स रिटर्नचे ई-व्हेरिफिकेशन; या सोप्या स्टेप्स करा फॉलो

E-verifying Your Income Tax Return Using Aadhaar Card : जर तुम्ही आयकर रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत तुमचा ITR व्हेरिफाय केला नसेल तर तो अवैध मानला जाईल.

कोमल दामुद्रे

ITR e-Verification Through Aadhaar:

आयकर रिटर्नची शेवटची दिनांक ३१ जुलै आहे. यासाठी आपण सगळेच आयकर रिटर्न भरतो आहे. जर तुम्ही आयकर रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत तुमचा ITR व्हेरिफाय केला नसेल तर तो अवैध मानला जाईल.

आधार कार्ड ग्राहक त्यांचा आधार क्रमांक वापरून आयकर रिटर्न इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफाय करू शकतात. या सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारशी पॅनशी लिंक केलेला असावा. ही संपूर्ण प्रक्रिया कशी असेल जाणून घेऊया सविस्तर

1. ई-व्हेरिफिकेशन करणे का आवश्यक आहे?

रिटर्न (Return) भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या आयकर रिटर्नची पडताळणी करावी लागेल. जर आयटीआर निर्धारित वेळेत व्हेरिफाय न झाल्यास ते अवैध मानले जाते. तुमचा ITR तपासण्याचा सर्वात व्यावहारिक आणि जलद मार्ग म्हणजे ई-व्हेरिफिकेशन.

2. आधार कार्ड वापरून रिटर्न ऑनलाइन ई-व्हेरिफाय करू शकता

  • आधारशी नोंदणी केलेला मोबाईल (Mobile) नंबरवर OTP

  • तुमच्या पूर्व-प्रमाणित बँक (Bank) खात्याद्वारे व्युत्पन्न केलेले EVC

  • तुमच्या पूर्व-प्रमाणित डीमॅट खात्याद्वारे व्युत्पन्न केलेले EVC

  • एटीएम (ATM) (ऑफलाइन पद्धत) द्वारे EVC

  • नेट बँकिंग

  • डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (DSC)

3. नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आधार ओटीपी

आधार-आधारित वन-टाइम पासवर्ड (OTP) वापरून तुमचा ITR व्हेरिफाय करण्यासाठी, तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे आणि UIDAI डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे तसेच तुमचा पॅन देखील आधारशी जोडलेला असणे आवश्यक आहे.

4. तुमचा आधार क्रमांक वापरून ITR ई-व्हेरिफाय कसे कराल?

  • ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करा आणि ई-व्हेरिफाय रिटर्न पर्यायावर क्लिक करा.

  • 'ई-व्हेरिफाय' पेजवर, 'आधारसोबत नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी वापरून पडताळणी करायची आहे' पर्यायाला निवडा आणि 'सुरू ठेवा वर' क्लिक करा.

  • एक पॉप-अप विंडो दिसेल ज्यामध्ये तुम्हाला 'मी माझे आधार तपशील प्रमाणित करण्यास सहमत आहे' असे टिक बॉक्स निवडण्यास सांगेल.

  • 'आधार ओटीपी जनरेट करा' त्यावर क्लिक करा

  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर 6 अंकी OTP असलेला SMS पाठवला जाईल.

  • त्यानंतर OTP टाका.

  • त्यानंतर आयटीआरची पडताळणी केली जाईल. OTP फक्त 15 मिनिटांसाठी वैध असेल.

  • व्यवहार आयडीसह तुम्हाला एक संदेश दिसेल आणि ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेल पाठविला जाईल.

5. जर मोबाईल नंबर आधारसोबत अपडेट केला नसेल

आधार OTP वापरून तुमचे रिटर्न ई-व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आधारसोबत अपडेट करणे आवश्यक आहे. आधार केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता. UIDAI वेबसाइटनुसार, साधारणपणे 90 टक्के अपडेट विनंत्या 30 दिवसांच्या आत पूर्ण केल्या जातात. मोबाईल नंबर यशस्वीरित्या अपडेट केल्यानंतर, दिलेल्या मोबाईल नंबरवर एक सूचना पाठवली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Husband Wife Clash : घटस्फोटित महिला दुसऱ्या पतीकडूनही पोटगीसाठी पात्र; हायकोर्टाचा निर्णय

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT