E-Challan Scam Alert google
बिझनेस

E-Challan Scam Alert: ई-चलानच्या नावाखाली मोठी फसवणूक! मोबाईलवर आलेला मेसेज खरा की खोटा? 2 मिनिटांत करा खात्री

Fake E-Challan SMS : ई-चलानच्या नावाखाली सुरू असलेल्या सायबर फसवणुकीपासून सावध राहा. बनावट एसएमएस, संशयास्पद लिंक आणि ऑनलाइन पेमेंट फसवणूक कशी ओळखायची तसेच सुरक्षित राहण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Sakshi Sunil Jadhav

देशात डिजिटल व्यवहार सुरू झाल्यापासून सायबर फसवणुकीचे प्रकारही वाढत चालले आहे. सध्या ई-चलानच्या (E-Challan) नावाखाली नागरिकांना फसवण्याचा नवीन प्रकार समोर आलाय. बऱ्याच जणांच्या मोबाईलवर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचा बनावट ई-चलान मेसेज पाठवला जातोय. हा मेसेज पाहून नागरिक घाबरत आहेत आणि त्यातले काही लिंकवर क्लिक करून आर्थिक फसवणुकीला बळी पडत आहेत.

सायबर गुन्हेगार बनावट ई-चलानाचा एसएमएस (E-Challan) पाठवतात. या मेसेजमध्ये तुमच्या वाहनाचं चलान भरायचं असेल तर लगेचच पेमेंट करण्यासाठी एक लिंक देतात. अनेकजण ही लिंक खरी आहे असं समजून त्यावर क्लिक करतात. त्यानंतर बँकेची माहिती, कार्ड तपशील किंवा ओटीपी भरल्यावर फसवणूक करणारे तुमच्या खात्यातले पैसे काढू शकतात. काही वेळेस या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये धोकादायक मालवेअरही डाउनलोड होते.

अस्सल आणि बनावट ई-चलान मेसेज ओळख्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यातली लिंक तपासा. सरकार किंवा वाहतूक विभागाकडून येणाऱ्या अधिकृत लिंकमध्ये .gov.in हा डोमेन असतो. उदा. echallan.parivahan.gov.in . जर मेसेजमध्ये .com, .net, .xyz, .apk किंवा bit.ly अशा लिंक दिसत असतील, तर ती बनावट असण्याची शक्यता आहे. अशा लिंकवर कधीही क्लिक करू नका.

तुम्हाला ई-चलानाची खात्री करायची असेल तर आधी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन वाहन क्रमांक टाकून तपासणी करा. मोबाईलवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर विश्वास ठेवू नका.

जर चुकून तुम्ही अशा फसवणुकीचे बळी ठरलात, तर क्षणात तुमच्या बँकेशी संपर्क साधून कार्ड किंवा नेट बँकिंग सेवा ब्लॉक करा. त्यानंतर राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन नंबर १९३० वर तक्रार नोंदवा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन तक्रार दाखल करा. वेळेवर तक्रार केल्याने नुकसान भरून मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MIDC मध्ये उद्योग धंद्यांच्या वासा ऐवजी, कचऱ्याचा वास येतोय- आदित्य ठाकरे

Govinda On Affair Rumours: तू लिमिटमध्ये राहा! गोविंदानं बायकोला दिली वॉर्निंग, रुमर्ड गर्लफ्रेंडसोबत व्हिडिओ झाला होता व्हायरल

Ind vs SL test : केएल राहुलनं बॅटमधून वाऱ्याच्या वेगानं निघालेला चेंडू फिल्डरच्या थेट डोक्याला लागला; मैदानातच उडाली धावपळ

Kitchen Garden : बाजारातली भाजी विसरा! घरात कुंडीतच उगवा या भाज्या

सोलापूर-दौंड-कलबुर्गि प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता रोज धावणार ट्रेन, कधी, कुठे थांबणार? पाहा गाड्यांचं पूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT