8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पगारात 65% वाढ शक्य? 10 ऑगस्टला मोठा निर्णय होणार

DA Hike : ७ आणि १० ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या आठव्या वेतन आयोगाच्या बैठकीत फिटमेंट फॅक्टर, DA, HRA, TA आणि बेसिक सॅलरीवर चर्चा होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबद्दल महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत.
8th Pay Commission
8th Pay Commissiongoogle
Published On

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. देशातल्या जवळपास एक कोटी कर्मचारी आणि रिटायरझालेल्या कर्मचाऱ्यांनी या आयोगाच्या शिफारशींकडे लक्ष ठेवून आहेत. आता आयोग महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचलेला असून, कर्मचारी संघटनांशी थेट चर्चा सुरू आहे.

आठव्या केंद्रीय वेतन आयोगाने ७ ऑगस्ट आणि १० ऑगस्ट २०२६ रोजी दिल्लीत कर्मचारी संघटना, महासंघ आणि केंद्र सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांतल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावलं आहे. या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या सूचना आणि मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर आयोग अंतिम अहवाल तयार करणार आहे.

8th Pay Commission
Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

या बैठकीत सर्वात जास्त भर बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), प्रवास भत्ता (TA) आणि एकूण पगाराच्या रचनेवर असणार आहे.

कर्मचारी संघटनांनी बेसिक पेमध्ये वाढ करण्यासाठी ३.८३ फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. फिटमेंट फॅक्टरच्या आधारेच सध्याचा बेसिक पगार नव्या वेतनात बदलला जातो. हा फॅक्टर वाढल्यावर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होऊ शकते.

तसेच ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशन (AINPSEF) ने कुटुंबाचा खर्च लक्षात घेऊन सॅलरी ठरवण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे बेसिक पेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

8th Pay Commission
Aashadhi Ekadashi 2026 : उपवासाला सतत तेच खाऊन कंटाळलात? १० मिनिटांत बनवा स्वादिष्ट गूळ-शेंगदाणा लाडू

प्रवास भत्त्याबद्दल (TA) लेव्हल - १ कर्मचाऱ्यांना ९००० प्रतिमहिन प्रवास भत्ता देण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. जर कर्मचारी संघटनांच्या या प्रमुख मागण्या सरकारने स्वीकारल्या, तर लेव्हल १ कर्मचाऱ्यांचा एकूण पगार ३७०८० वरून ६१३४४ पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच जवळपास ६५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण हा शेवटचा निर्णय नसून आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या मंजुरीनंतर याबद्दल स्पष्टता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com