Sakshi Sunil Jadhav
विठ्ठल भक्तांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे, कारण २५ जुलै रोजी म्हणजेच उद्या आषाढी एकादशीचा सण साजरा केला जाणार आहे. यालाच देवशयनी एकादशी असंही म्हणतात.
एकादशीला बरीच भक्त मंडळी उपवास ठेवतात. या दिवशी फक्त साबुदाण्याची खिचडीच नाही तर तुम्ही गूळ- शेंगदाण्याचे लाडू सुद्धा बनवू शकता.
पुढे आपण गूळ- शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे याची सोपी आणि योग्य रेसिपी जाणून घेणार आहोत.
भाजलेले शेंगदाणे, शेंगदाण्यांच्या अर्धा गूळ, १ चमचा वेलची पावडर, १ ते २ चमचे तूप इ.
सर्वप्रथम तव्यावर शेंगदाणे चांगले भाजून घ्या. त्यासाठी गॅस स्लोच ठेवा.
शेंगदाणे खमंग भाजून झाले की एका ताटात काढून त्यांची साल काढून घ्या.
पुढे शेंगदाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. आता त्यामध्ये वेलची पावडर घालून मिश्रण एकत्र करा.
शेवटी तूप गरम करून ते मिश्रणात मिक्स करून लाडू वळायला घ्या.
मऊ वळून झाले की, १५ मिनिटं तसेच ठेवा. ते छान सेट झाल्यावर तुम्ही खाऊ शकता.