

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) लोकल बँक ऑफिसर (Local Bank Officer - LBO) पदांसाठी ५४५ रिक्त जागांची भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये महाराष्ट्रासाठी ६७ जागा राखीव ठेवण्यात आल्या असून इच्छूक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येईल.
तसेच या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रोसेस २० जुलै २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटती तारीख ९ ऑगस्ट २०२६ आहे. यामध्ये ऑनलाइन परीक्षा ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२६ मध्ये होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातल्या ६७ जागांपैकी १२ जागा अनुसूचित जाती (SC), १० अनुसूचित जमाती (ST), ७ इतर मागासवर्ग (OBC), १४ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि २४ जागा खुल्या प्रवर्गासाठी (UR)आहेत. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठीही ५ पदे राखीव ठेवण्यात आलेली आहेत.
तुम्ही या पदासाठी अर्ज करणाऱ्या करत असाल तर तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी पूर्ण असायला हवी. अर्जदाराचं वय १ जुलै २०२६ रोजी २० ते ३० वर्षे दरम्यान असायला हवे. सरकारी नियमांनुसार SC/ST, OBC आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
या भरतीसाठी अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकेत किमान एक वर्षाचा लिपिक किंवा अधिकारी म्हणून अनुभव असायला हवा. महाराष्ट्रातून अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे अनिवार्यच असेल. दहावी किंवा बारावीत मराठी विषय नसलेल्या उमेदवारांना स्थानिक भाषा प्राविण्य परीक्षा (LLPT) द्यावी लागेल.
निवड झालेल्या उमेदवारांना ₹४८,४८० ते ₹८५,९२० या वेतनश्रेणीसह महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि इतर भत्ते मिळणार आहेत. सर्व भत्ते मिळून मासिक पगार १ लाखांपेक्षा जास्त होऊ शकतो.
उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, आवश्यक असेल तर स्थानिक भाषा प्राविण्य परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे केली जाईल. अंतिम गुणवत्ता यादी लेखी परीक्षा आणि मुलाखतीतल्या गुणांच्या मदतीने तयार केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Recruitment या विभागातून ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
अर्ज शुल्क इच्छुक उमेदवारांनी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन SC/ST/PwBD उमेदवारांसाठी ५९ रुपये GST सहित आणि इतर सर्व उमेदवारांसाठी १,१८० रुपये ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेआधी अर्ज करून या भरतीची संधी नक्कीच मिळवावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.