अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम जगभरासहित भारताच्या शेअर बाजारावरही दिसला. आठवड्याच्या चौथ्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १५० अंकांनी घसरला. भारतीय रुपयामध्ये घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेचा डॉलर ८५.७८ रुपयांवर पोहोचला.
ट्रम्प यांच्या घोषणेमुळे जगभरातील देशांना फटका बसला आहे. अमेरिकेने जगभरातील देशांसाठी वेगवेगळे आयात शुल्क लागू केले आहेत. अमेरिकेने चीनवर ३४ टक्के, युरोपीयन संघ २० टक्के, जपान २४ टक्के आणि भारतासाठी २७ टक्के लागू केले आहेत. आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर आशियाई बाजारात भूकंप झाला आहे. जपानच्या स्टॉक मार्केटवर मोठा परिणाम झाला आहे.
शेअर मार्केट गुरुवारी सुरु झाल्यानंतर बीएसईचं सेन्सेक्स ७६,६१७.४४ पातळीवरून घसरून ७५,८११.८६ वर घसरला. तर एनएसईचा निफ्टी इंडेक्स २३,३३२.३५ पातळीवरून २३,१५० वर पोहोचला.
शेअर बाजार सुरु होताच आयटी आणि टेकच्या शेअरवर मोठी घसरण पाहायला मिळाली. HCL Tech Share (2.50 टक्के), Infosys (2.35 टक्के), TCS (2.10 टक्के), Tech Mahindra (2 टक्के) शेअरमध्ये घसरण झाली. मिडकॅप कॅटेगिरीच्या KPI Tech Share (3.92 टक्के), coforge Share (3.10 टक्के), Mphasis Share (3.05 टक्के), LTTS Share (2 टक्के) शेअरमध्ये घसरण दिसून आली. स्मॉलकॅप कॅटेगिरीमधील Avanti Feed Share (6.75 टक्के) आणि Goldiam Share (6.37 टक्के) घसरण पाहायला मिळाली.
आयटी आणि टेकच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर दुसरीकडे फार्मा क्षेत्रातील शेअरमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. लार्जकॅप कॅटेगिरीच्या सनफार्मा शेअरमध्ये जबरदस्त उसळी दिसली. या व्यतिरिक्त GlandPharma Share (7.15 टक्के), Aurobindo Pharma Share (6.55 टक्के). Lupin (6.35 टक्के), Emcure Pharma (5 टक्के), Biocon Share (3.90 टक्के), Ajanta Pharma Share (3.07 टक्के) च्या शेअरमध्ये उसळी दिसली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.