Maharashtra Vidhan Sabha Election: सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान करणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. मतदान करण्यासाठी प्रत्येक नागरिकाकडे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. मतदान कार्ड असलेल्या नागरिकांचे नाव मतदार यादीत असते. त्यानंतरच तुम्ही मतदान करु शकतात.
अनेकदा एकाच व्यक्तीकडे दोन किंवा अधिक मतदान कार्ड असते. जर तुमच्याकडेही दोन किंवा त्यापेक्षा जास्त मतदान कार्ड असेल तर तो गुन्हा मानला जातो. कायदेशीररित्या हा गुन्हा असून एका व्यक्तीकडे एकच मतदान कार्ड असायला हवे. वेगवेगळ्या ठिकाणांहून दोन मतदान कार्ड असलेला व्यक्ती आढळल्यास त्याला एका वर्षाची कारावासाची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो. किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
बनावट मतदान कार्ड अनेकदा लोक बनावट मतदान कार्ड बनवतात. हेच बनावट मतदान कार्ड ओळखण्यासाठी आता निवडणूक आयोगाने आधार कार्ड आणि वोटर आयडी लिंक करण्यास सुरुवेत केली आहे. त्यामुळे एका व्यक्तीचे मतदान कार्ड एका आधार कार्डला लिंक होईल. यामुळे बनवाट आधार कार्ड लगेचच ओळखता येईल. (Voter ID Rule)
तुमच्याकडे जर २ मतदान कार्ड असेल तर ते रद्द करण्यासाठी फॉर्म ७ भरु शकतात. हा फॉर्म तुम्ही ऑनलाइन पद्धतीने किंवा जवळच्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन भरु शकतात.फॉर्ममध्ये तुम्ही माहिती भरुन नाव रद्द करण्यासाठी सांगू शकतात. हा फॉर्म अधिकाऱ्याकडे जमा करा.
अनेकदा नागरिकांना कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या पत्त्यांवरुन मतदान कार्ड बनवले जाते. परंतु ती व्यक्ती एकाच पत्त्यावर स्थायिक झाल्यानंतर जुने मतदान कार्ड रद्द न करता दुसऱ्या ठिकाणावर मिळवलेले मतदान कार्ड मिळते. परंतु एकाच वेळी दोन वेगवेगळे मतदान कार्ड बनवणे कायद्याने गुन्हा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.