Aadhaar Card Update: आधार कार्ड मोफत अपडेट करा; मुदत वाढली; शेवटची तारीख कधी?

Aadhaar Card Free Update: ऑनलाइन पद्धतीने मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. १४ डिसेंबरपर्यंत तुम्ही मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात.
Aadhaar Card Update
Aadhaar Card UpdateSaam Tv
Published On

भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डशिवाय कोणतेही महत्त्वाचे का होत आहे. तुम्हाला कॉलेजपासून ते अगदी मॅरेज सर्टिफिकेट तयार करण्यासाठी आधार कार्डची आवश्यकता असते. आधार कार्ड हे अपडेट करायचे असते. आता ऑनलाइन मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे.

गेल्या १० वर्षात जर तुम्ही तुमचा आधार कार्डचा पत्ता, नाव, जन्मतारीख अपडेट केली नसेल तरआता करा. युनिक आयडेटिफिकेशन ऑफ इंडियानं यासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. आता तुम्ही १४ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने मोफत आधार कार्ड अपडेट करु शकतात. (Aadhaar Card Free Update)

Aadhaar Card Update
Government Scheme: व्यवसाय सुरु करा, कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांचे कर्ज; पीएम विश्वकर्मा योजना नक्की आहे तरी काय?

यूआयडीएआच्या (UIDAI) माहितीनुसार, जर तुम्ही गेल्या १० वर्षात आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते अपडेट करावे. तुम्हाला दहा वर्षातून एकदा आधार कार्ड अपडेट करणे गरजेचे आहे.यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जून २०२४ होती. ही तारीख वाढवून १४ सप्टेंबर २०२४ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी नागरिकांनी आधार कार्ड अपडेट करावे. अन्यथा तुम्हाला शुल्क भरावे लागणार आहे. (Aadhaar Card Update)

Aadhaar Card Update
PM Internship Scheme: केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी दर महिन्याला मिळणार ५००० रुपये; पीएम इंटर्नशिप योजना नक्की आहे तरी काय?

आधार कार्ड अपडेट करण्याची प्रोसेस (Aadhaar Card Update Process)

  • आधार कार्डवर तुमचा १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. हा नंबर सर्वात जास्त महत्त्वाचा असतो.

  • आधार अपडेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • त्यानंतर My Aadhaar वर क्लिक करा. यानंतर

  • Update Aadhar Card वर क्लिक करा.

  • यानंतर तुम्ही तुम्ही माहिती भरुन कागदपत्रे अपडेटवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल तो टाका.

  • ओटीपीनंतर लॉग इन करा. जी माहिती अपडेट करायची आहे ती निवड आणि योग्य माहिती भरा.

  • यानंतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करा आणि सबमिट करा.

  • यानंतर तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर मिळेल. त्यावर तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करु शकतात.

Aadhaar Card Update
APY Scheme: दररोज ७ रुपये गुंतवा अन् ५ हजारांची पेन्शन मिळवा; अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक कशी करायची?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com