DA Hike: Saam Tv
बिझनेस

DA Hike: ३% की ५%, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार ? वाचा सविस्तर

Government Employees DA Hike January 2026: नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना डबल गिफ्ट मिळालं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे. हा महागाई भत्ता कितीने वाढणार आहे हे जाणून घ्या.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार

किती टक्क्यांनी महागाई भत्ता वाढणार?

वर्षातून दोनदा वाढवला जातो महागाई भत्ता

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता लवकरच वाढणार आहे.सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी आणि जून महिन्यात हा महागाई भत्ता वाढवला जातो. त्यामुळे आता जानेवारी २०२६ चा महागाई भत्ता कधीपासून वाढणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडलेला आहे.

श्रम आणि रोजगार मंत्रालयाने नोव्हेंबर २०२५ चा ऑल इंडिया प्राइस इंडेक्ट फॉर इंडस्ट्रीयल वर्कर्स (AICPI-IW) जारी केला आहे. हा इंडेक्स १४८.२वर आहे. याच (AICPI-IW) च्या आधारावर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ठरवला जातो. दरम्यान, यामुळेच पेन्शन आणि पगारात महागाई भत्ता येतो.

जानेवारीचा महागाई भत्ता कधी येणार? (When Will DA Hike Come)

महागाई भत्त्याचा आढावा आता जानेवारी महिन्यात होणार आहे. दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेतला जातो. याआधी जुलै २०२५ मध्ये महागाई भत्ता वाढवण्यात आला होता. महागाई भत्ता ५४ टक्क्यांवरुन ५८ टक्के केला होता. आतादेखील कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे की, AICPI-IW १४७ ते १४८ च्या जवळपास राहिला तर महागाई भत्ता ३ ते ५ टक्क्यांनी लाढला जाऊ शकतो.

महागाई भत्ता किती टक्क्यांनी वाढणार? (How much DA Hike in January 2026)

ऑल इंडिया एनपीएस एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष मनजीस सिंग पटेल यांनी सांगितले की, डिसेंबर २०२५ मध्ये AICPI-IW १४७ असेल तर महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढू शकतो. जर डिसेंबरमध्ये AICPI-IW १४८.२ टक्के असेल तर महागाई भत्ता ५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnadurg Fort : रत्नागिरीच्या रत्नदुर्ग किल्ल्यात दडली आहेत अनेक रहस्ये, एकदा जाणून घ्याच

Maharashtra News Live Update: शरद पवारांसोबतची आजची भेट राजकीय भेट नव्हती - दिलीप वळसे पाटील

पोलिसांचा शासकीय निधीवर डल्ला; ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार,२ लिपिकांसह ५ पोलिसांवर गुन्हा दाखल

Rain Alert: राज्यासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे, अतिमुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट

Coal Block Case : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सुरू होता खटला, आता क्लीन चिट; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT