DA Hike Saam Tv
बिझनेस

DA Hike: खुशखबर! आठव्या वेतन आयोगाआधी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ; या महिन्यापासून येणार

Salary Hike Before 8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आठव्या वेतन आयोगाआधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जाणार आहे.

Siddhi Hande

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

महागाई भत्त्यात वाढ

सातव्या वेतन आयोगातील शेवटचा महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आता आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे.

महागाई भत्ता वाढला (DA Hike Annoucement)

सरकारने बुधवारी महागाई भत्त्याची घोषणा केली होती. महागाई भत्ता हा ३ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे महागाई भत्ता हा ५८ टक्के झाला आहे. हा सातव्या वेतन आयोगातील शेवटचा महागाई भत्ता असेल. त्यानंतर आठवा वेतन आयोग लागू केला जाईल. त्यामुळे आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे.

या महिन्यापासून दिला जाणार महागाई भत्ता

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ केली जाते. जानेवारी आणि जुलै अशा दोन टप्प्यांमध्ये महागाई भत्ता वाढला जातो. दरम्यान, आता जो महागाई भत्ता वाढला तो जुलैचा आहे. महागाई भत्ता हा ३ महिने उशिराने वाढला आहे. नोव्हेंबरपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता दिला जाणार आहे. दरम्यान, याचसोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात ३ महिन्यांचा एरियरदेखील दिला जाणार आहे.

आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट

सातव्या वेतन आयोगातील हा शेवटचा महागाई भत्ता असणार आहे. आठवा वेतन आयोग हा जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. दरम्यान, हा वेतन आयोग लांबणीवर जाऊ शकतो. मात्र, यासाठीचा एरियर कर्मचाऱ्यांना दिला जाईल. दरम्यान, आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार याची कर्मचारी आतुरतेने वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोंबिवलीतील पलावा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई; 24 नायजेरियन नागरिक ताब्यात

Virat Kohli: भर मैदानात ट्रेविस हेडशी भिडला विराट कोहली; सामन्यानंतर हँडशेक करणंही टाळलं, नेमकं काय घडलं, VIDEO

Maharashtra News Live Update: लाल बहादूर शास्त्रींच्या पुतळ्याचं स्थलांतर करण्याचा प्रयत्न, काँग्रेसचं आंदोलन

Accident: उकाड्यामुळे घराबाहेर झोपले अन् भयंकर घडलं, भरधाव डंपरने चौघांना चिरडले; संपूर्ण कुटुंबाचा करुण अंत

Water Metro : मुंबईकरांसाठी खुशखबर! पहिली वॉटर मेट्रो २५ मे रोजी बंदरात दाखल होणार; वाचा A to Z माहिती

SCROLL FOR NEXT