
केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना खुशखबर देणार आहे. सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. सरकार महागाई भत्ता (DA)आणि महागाई सवलतीत (DR) वाढ करणार आहे. दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ७व्या वेतन आयोगाची घोषणा लवकरच केली जाईल कारण १ जानेवारी २०२६ पासून ८वा वेतन लागू होणार आहे. त्यामुळेच हा महागाई भत्ता लवकरच वाढवण्याची शक्यता आहे.
कधी वाढणार महागाई भत्ता? (When Will DA Hike Under 7th Pay Commission)
सरकार वर्षभरात दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढतो. नवी दर १ जुलैपासून लागू होतात. परंतु याची घोषणा उशिरा होते. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ही घोषणा होते. कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्याचे एरियर्स मिळतात.
सरकारी कर्मचाऱ्यांना आशा आहे की,सणासुदीच्या पूर्वी सप्टेंबर महिन्यात महागाई भत्त्याची घोषमा होऊ शकतात. या वर्षी दिवाळी २० ऑक्टोबर रोजी आहे. त्याआधी महागाई भत्ता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशी घोषणा झाली तर सप्टेंबरच्या पगारात एरियर जोडून दिला जाईल. त्यामुळे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळणार आहे.
किती फायदा होणार? (Benefits Of DA Hike)
जर महागाई भत्ता ३ टक्क्यांनी वाढला तर १८००० रुपये बेसिक सॅलरी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात ५४० रुपयांनी वाढ होणार आहे. तसेच ९००० रुपये बेसिक पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २७० रुपयांनी वाढ होणार आहे. हा निर्णय सरकार करणार आहे. महागाई भत्ता किती टक्क्याने वाढवायचा याबाबत निर्णय झाल्यावर पगारात किती वाढ होणार हे ठरवलं जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.