Cyrus Poonawalla buys Ravi Varma Painting Saam tv
बिझनेस

Ravi Varma Painting: पुण्यातील उद्योगपतीनं खरेदी केली १६७ कोटींची पेटिंग, नेमकं खास काय आहे?

Cyrus Poonawalla buys Ravi Varma Painting: सायरस पूनावालांनी राजा रवि वर्मा यांचे ‘यशोदा आणि कृष्ण’ चित्र १६७ कोटींना खरेदी करून भारतीय कला बाजारात नवा रेकॉर्ड केला आहे.

Shruti Vilas Kadam

Cyrus Poonawalla buys Ravi Varma Painting : भारतीय कला क्षेत्रात एक ऐतिहासिक घडामोड घडली असून, Cyrus Poonawalla यांनी प्रख्यात चित्रकार राजा रवि वर्मा यांचे सुप्रसिद्ध ‘यशोदा आणि कृष्ण’ हे चित्र तब्बल १६७.२ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. सॅफ्रनआर्ट द्वारे आयोजित लिलावात हे चित्र सुमारे १८ दशलक्ष डॉलर्स म्हणजेच १६७.०२ करोडला विकले गेले. यामुळे हे चित्र आधुनिक भारतीय कलेच्या इतिहासातील सर्वात महागड्या कलाकृतींपैकी एक ठरले आहे.

या खरेदीमुळे भारतीय कला बाजारात नवा रेकॉर्ड करण्यात आला आहे. याआधीएम. एफ. हुसेन यांच्या ‘ग्राम यात्रा’ या चित्राने रेकॉर्ड केला होता. हे चित्र किरण नाडर यांनी १८ कोटी रुपयांहून अधिक किमतीला खरेदी केले होते. मात्र, ‘यशोदा आणि कृष्ण’ चित्राने हा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

पूनावाला यांनी या ऐतिहासिक खरेदीचे वर्णन एक 'सन्मान' आणि त्याच वेळी एक 'महत्त्वाची जबाबदारी' असे केले आहे. त्यांनी असे नमूद केले की, हे चित्र भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक अविभाज्य भाग आहे आणि ते सर्वसामान्य जनतेला पाहता यावे यासाठी त्याचे वेळोवेळी प्रदर्शन भरवले गेले पाहिजे.

१८१८ मध्ये जन्मलेले राजा रवि वर्मा हे भारतीय कलेतील अत्यंत महत्वाचे चित्रकार होते. त्यांनी युरोपियन चित्रकलेच्या तंत्रांचा वापर भारतीय पौराणिक विषयांसोबत करून एक अनोखा संगम साधला. १८९४ मध्ये त्यांनी लिथोग्राफिक प्रेसची स्थापना करून आपल्या चित्रांच्या प्रती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवल्या ज्यामुळे त्यांच्या कलेचा प्रभाव घराघरात पोहोचला.

‘यशोदा आणि कृष्ण’ हे चित्र विशेषतः मातृत्वाच्या प्रेमाचे सुंदर दर्शन घडवते. माता यशोदा आणि बालकृष्ण यांच्यातील मायेच्या नात्याचे अत्यंत संवेदनशील चित्रण यात पाहायला मिळते. १८९० च्या दशकात साकारलेले हे चित्र रवि वर्मांच्या कारकिर्दीतील उत्कृष्ट कलाकृतींपैकी एक मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT