Crude oil price increase petrol and diesel prices hiked in maharashtra know latest fuel rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price (8th August): कच्चा तेलाच्या किंमती वाढल्या; पेट्रोल डिझेल महागलं, जाणून घ्या आजचा भाव

Petrol Diesel Price Maharashtra Today: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात चढउतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत आहे.

Satish Daud

Petrol Diesel Price Maharashtra Today: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात चढउतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरावर होत आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ झाली. कच्चा तेलाच्या दरात वाढ होताच देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी केले आहेत.

इंधन कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, मध्य प्रदेशात पेट्रोल ३७ पैशांनी तर डिझेल ३६ पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पैशांची वाढ झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल ४४ पैशांनी तर डिझेल ४१ पैशांनी महागलं आहे.

दुसरीकडे राजस्थानमध्ये पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ३२ पैशांनी स्वस्त झालं आहे. तर हिमाचलमध्येही पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही इंधनाच्या किमतीत किंचित घट झाली आहे. मुंबईमध्ये पेट्रोल डिझेलचे दर जैथे आहेत.

पेट्रोल डिझेलचे दर कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारभूत असतात. गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात ०.३८ डॉलर्सनी वाढ झाली. त्यामुळे ब्रेंट क्रूडचे दर प्रतिबॅरेल 85.72 डॉलर्सवर पोहचले. याचा परिणाम देशातील इंधनाच्या किंमतीवर दिसून आला.

चार प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये, डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

मुंबईत (Mumbai) पेट्रोल 106.31 रुपये, डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये, डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT