Pune Water Supply: पुणेकरांना मोठा दिलासा! गुरुवारचा ‘पाणी बंद’चा निर्णय अखेर मागे

Pune Water Supply News: येत्या गुरूवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती आहे.
Pune Water Supply News Today In Marathi
Pune Water Supply News Today In MarathiSaam TV
Published On

Pune Water Supply News Today: पुणेकरांना दिलासा देणारी बातमी आहे. येत्या गुरूवारी शहरातील काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीतर्फे शहरातील पर्वती उपकेंद्र येथे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार होते. त्यामुळे पुणे महापालिकेने गुरुवारी ( ता. १०) पर्वती जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपींग व वडगाव जलकेंद्र यांच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असे जाहीर केले होते.

Pune Water Supply News Today In Marathi
Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला! पुढील २४ तासांकरिता कोणताही अलर्ट नाही

मात्र, यासंदर्भात काही नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी केल्यानंतर महापालिकेने हा निर्णय मागे घेतला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेने पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला होता.

दरम्यान, निर्णय मागे घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात गुरुवारी (ता. १०) महापारेषण कंपनीने विद्युतविषयक देखभाल-दुरुस्तीची कामे काढली. त्यामुळे जलकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याने शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल, असे महापालिकेने जाहीर केले. मात्र यासंदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी झाल्याने प्रशासकीय पातळीवर गोंधळ उडाला.

Pune Water Supply News Today In Marathi
Mumbai Crime News: धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून तरुणीला फेकलं; दादर रेल्वे स्टेशनमधील घटना

चंद्रकांत पाटील यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी चर्चा केली असता, त्यांना काहीच माहीत नव्हते. अशाप्रकारे परस्पर पाणीबंदचा निर्णय घेणे योग्य नाही, इतके दिवस दर गुरुवारी पाणी बंद होते, तेव्हा महापारेषणने ही कामे का केली नाहीत, असा प्रश्‍नही पालकमंत्री पाटील यांनी करत नाराजी व्यक्त केली, असे सूत्रांनी सांगितले.

यानंतर महापारेषणने महापालिकेला ई-मेल पाठवत गुरुवारची दुरुस्तीचे काम करणार नसल्याचे कळविले. तसेच महापालिकेने गुरुवारी पाणीबंद ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, जून, जुलै महिन्यांत खडकवासला धरण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणे ९० टक्के भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांची वर्षभर पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com