Maharashtra Rain Alert Weather Updates: भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील २४ तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज किंवा येलो अलर्ट देण्यात आलेला नाही.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्यूमेक्स) खालीलप्रमाणे:-
हातनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आतापर्यंत ४६४ क्यूमेक्स विसर्ग. गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आतापर्यंत २०५३.९८ क्यूमेक्स विसर्ग. भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आतापर्यंत ५४.९३ क्यूमेक्स विसर्ग. दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आतापर्यंत ३५.४० क्यूमेक्स विसर्ग. दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आतापर्यंत ६८ क्यूमेक्स विसर्ग. राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आतापर्यंत ८० क्यूमेक्स विसर्ग. (Latest Marathi News)
ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आतापर्यंत ९४ क्यूमेक्स विसर्ग. बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आतापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग. निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आतापर्यंत १७.४३ क्यूमेक्स विसर्ग. वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आतापर्यंत ४५ क्यूमेक्स विसर्ग. सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आतापर्यंत १८.४० क्यूमेक्स विसर्ग. चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आतापर्यंत ३१ क्यूमेक्स विसर्ग. पानशेत (पुणे) (एकूण क्षमता ३०१.६१ दलघमी) आतापर्यंत १७ क्यूमेक्स विसर्ग.
पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी सकाळी ४:५२ वाजता व दुपारी ४:३९ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.७ मीटर आणि दुपारी ३. ८ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.