Credit Card, Credit Card Transaction In March Rises 20% Saam Tv
बिझनेस

Credit Card : मार्च महिन्यात क्रेडिट कार्डचा खर्च १ लाख कोटींच्या पुढे, डेबिट कार्डच्या खर्चावर होतोय परिणाम

Credit Card Transaction In March Rises 20% : भारतात क्रेडिट कार्ड सर्वाधिक प्रमाणात वापरले जात आहे. मार्च २०२४ मध्ये क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खर्चाचा आकडा प्रथमच १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. या महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे केला जाणारा खर्च २० टक्क्यांनी वाढला आहे.

कोमल दामुद्रे

Credit Card Transaction :

भारतात क्रेडिट कार्ड सर्वाधिक प्रमाणात वापरले जात आहे. मार्च २०२४ मध्ये क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खर्चाचा आकडा प्रथमच १ लाख कोटींच्या पुढे गेला आहे. या महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे केला जाणारा खर्च २० टक्क्यांनी वाढला आहे.

मार्चमध्ये क्रेडिट कार्डचा (Credit card) खर्च ८६,९३० कोटी होता. तर फेब्रुवारीमध्ये ८४,७७४ कोटी रुपये होता. म्हणजेच मागील महिन्यात जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

1. क्रेडिट कार्ड घेण्याची संख्या वाढली

ऑफलाइन पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे होणाऱ्या क्रेडिट कार्डच्या खर्चाच १९ टक्के वाढ झाली आहे. हा खर्च मार्च २०२३ मध्ये ५०,९२० कोटी होता. तो आता ६०,३७८ कोटी रुपये (Price) झाला आहे.

देशात क्रेडिट कार्ड घेण्याची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच क्रेडिट कार्डची संख्या दहा कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या वर्षी क्रेडिट कार्डची संख्या ८.५० कोटी होती. त्यात आता २० टक्के वाढ झाली असून मार्च महिन्यात १०.२० कोटी रुपये झाली आहे.

2. या बँकेच्या क्रेडिट कार्डचा सर्वाधिक वापर

मागील आर्थिक वर्षात एचडीएफसी बँकेकडे क्रेडिट कार्ड युजर्सची संख्या सर्वाधिक होती. जवळपास २०.२ टक्के लोक एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरायचे. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचे १८.५ टक्के क्रेडिट कार्ड युजर्स होते. त्यानंतर देशातील प्रायव्हेट बँकाचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक वापरले जातात.

भारतात डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहरांमध्ये घट झाली आहे. जवळपास ३० टक्क्यांनी यात घट झाली आहे. मार्च २०२४ मध्ये जवळपास ११.६० कोटी रुपयांचे ऑफलाइन (Offline) डेबिट व्यवहार झाले आहे. तर ४.३० कोटी रुपयांचे ऑनलाइन डेबिट कार्ड व्यवहार झाले आहे. दुकानांमध्ये जाऊन डेबिट कार्ड वापरण्याची संख्या १७ टक्क्यांनी घसरली आहे. तर ऑनलाइन व्यवहार १६ टक्क्यांनी घटले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card on WhatsApp: आता व्हॉट्सअ‍ॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स

Khandeshi Vangyache Bharit Recipe: खान्देशी स्टाईल झणझणीत वांग्याचं भरीत कसं बनवायचं?

Maharashtra Live News Update : निकाल लागल्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांची कार पेटवली, घटना सीसीटीव्हीत कैद

Mrunal And Dhanush: मृणाल ठाकूर आणि धनुष व्हॅलेंटाईन डेला अडकणार लग्नबंधनात? वाचा महत्वाची अपडेट

Palmistry: अशा व्यक्ती राजकारण-मॉडेलिंगमध्ये कमावतात खूप नाव; पाहा तुमच्या हातावरच्या रेषा काय सांगतात?

SCROLL FOR NEXT