WhatsApp New Features : व्हॉट्सअ‍ॅपच नवं अपडेट! इंटरनेटशिवाय शेअर करता येणार फोटो आणि फाईल्स

WhatsApp Using Without Internet : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन अपडेट आणत असते. अशातच व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच फाइल-शेअरिंग सपोर्ट २ जीबी पर्यंत वाढवला आहे.
WhatsApp New Feature
WhatsApp New FeatureSaam Tv

WhatsApp Rolled Out New Features :

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवीन अपडेट आणत असते. अशातच व्हॉट्सअ‍ॅपने नुकतेच फाइल-शेअरिंग सपोर्ट २ जीबी पर्यंत वाढवला आहे. यामध्ये तुम्हाला इंटरनेट न वापरता जवळपासच्या लोकांना फाइल्स किंवा फोटो पाठवण्याची परवानगी देण्यासाठी एका वैशिष्ट्याची चाचणी करत आहे.

या ऑफलाइन (Offline) मोडची सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp) अँड्रॉइड बीटा आवृत्तीसह चाचणी केली जात आहे. जी तुमच्या फोनवर जवळपासच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देईल. तसेच यातून फोनमधील तुमचे फोटो गॅलरी आणि डिव्हाइसचे स्थान देखील दर्शवते.

ऑफलाइन व्हॉट्सअ‍ॅपबाबत यापूर्वी खोट्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. परंतु टूल बीटा चाचणीमार्फत लवकरच नवीन अपेडट येण्याची शक्यता आहे. सध्या सगळ्याच अॅप्सना प्रभावी होण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. येत्या काही काळात व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन व्हर्जन (Update) पाहायला मिळेल.

WhatsApp New Feature
ITR कडून करदात्यांना दिलासा! पॅन-आधार लिंक केले नसेल तर दंड भरण्याच्या मुदतीत वाढ

नवीन अपडेटेड व्हॉट्सअ‍ॅप

तुमच्या स्क्रीनच्या खाली दिसणाऱ्या + आयकॉनवर तुम्ही क्लिक करता तेव्हा नवीन विभागाच्या मदतीने याचे तपशील देण्याच्या नवीन मार्गाची चाचणीही इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म करत आहे. हे नवीन फीचर सध्या Android युजर्ससाठी चाचणीसाठी ठेवले आहे.

यात २.२४.९.१४ आवृत्ती वापरत आहेत जसे की, WABetaInfo ने या आठवड्यात त्याच्या नवीन पोस्टमध्ये सांगितले आहे. हे त्याच्या इंटरफेसमध्ये 'Recently Online' नावाचा नवीन टॅब जोडत आहे. ज्यामुळे तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरील सर्व संपर्कांची नावे पाहता येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com