Government Scheme SAAM TV
बिझनेस

Government Scheme: या राज्य सरकारची खास योजना! मुलींना मिळतात ₹५०,००० रुपये ; वाचा सविस्तर

Bihar CM Kanya Uttan Yojana: बिहार सरकारने मुलींसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना उच्च शिक्षणासाठी ५०,००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

बिहार सरकारची कन्या उत्तन योजना

मुलींना मिळणार ५०,००० रुपये

उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

केंद्र सरकाने मुलींसाठी अनेक योजना सुरु केल्या आहे. मुलींना उत्तम शिक्षण मिळावे, त्यांचे भविष्य उज्जवल व्हावे, यासाठी योजना सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता विविध राज्य सरकानेही एक योजना सुरु केली आहे. बिहार सरकारने मुलींसाठी कन्या उत्तन योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते.

कॉलेज संपल्यानंतर उच्च शिक्षणासाठी पैसे नसल्याने अनेक मुली शिक्षण थांबवतात. मात्र, हा खर्च भागवण्यासाठी सरकार मदत करणार आहे. कॉलेजची फी, पुस्तके, राहणीमानाचा खर्च यामुळे कुटुंबावर आर्थिक ताण येतो. मात्र, बिहार सरकारच्या उपक्रमामुळे मुलींना आणि त्यांच्या कुटुंबाला खूप मदत होणार आहे.

मुलींना मिळणार ५०,००० रुपये (Girls Get 50,000 Rupees)

बिहारमधील मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत मिळणार आहे. सरकार मुलींना ५०,००० रुपयांपर्यंतचे अनुदान देणार आहे. मुलींना कोणत्याही आर्थिक चिंतेशिवाय आपल्या करिअरवर फोकस करता येणार आहे.

ही शिष्यवृत्ती बिहार सरकारच्या शिक्षण विभागाअंतर्गत चालवली जाते. या योजनेत मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून पदवीप्राप्त मुली अर्ज करु शकतात.

या योजनेअंतर्गत मिळणारा निधी मुलींच्या बँक खात्यात जमा केला जातो. यासाठी बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे तुम्ही सहजपणे अर्ज करु शकतात.

पात्रता

मुलगी ही बिहारची रहिवासी असणे अनिवार्य आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त नसावे. ५०,००० रुपयांच्या निधीमध्ये प्रवेश शुल्क, अभ्यासक्रम साहित्य, परीक्षा शुल्क आणि इतर खर्च समाविष्ट आहेच. अर्ज करताना ओळखपत्र, आधार कार्ड, निवासाचा पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला द्यायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माज उतरलेला नाही; रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर विजय वडेट्टीवारांची पहिली प्रतिक्रिया

रुपाली चाकणकरांना अशोक खरात प्रकरण भोवलं; महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही जाणार

Saturday Horoscope : अचानक पैशांची भरभराट होणार; वृषभसह ५ राशींच्या लोकांना लागणार लॉटरी

अशोक खरातची दुसरी बाजू....; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

Air India: हवेतच ७ तास घिरट्या अन्..; दिल्लीहून व्हँकुव्हर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं काय झालं?

SCROLL FOR NEXT