Destini Prime 125 Saam Tv
बिझनेस

Hero ची जबरदस्त ऑफर! फक्त 8999 रुपयांमध्ये 125cc ची दमदार स्कूटर घेऊन जा घरी

Destini Prime 125: Hero MotoCorp ने आपल्या 125cc स्कूटर Destini Prime वर जबरदस्त डाउन पेमेंट ऑफर दिली आहे. या स्कूटरची किंमत 81,599 रुपयांपासून सुरू होते.

Satish Kengar

देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने या महिन्यात आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय चांगली ऑफर दिली आहे. कंपनीने आपल्या 125cc स्कूटर Destini Prime वर जबरदस्त डाउन पेमेंट ऑफर दिली आहे. या स्कूटरची किंमत 81,599 रुपयांपासून सुरू होते. पण आता ऑफर अंतर्गत स्कूटर खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे.

Destini Prime स्कूटर बाजारात TVS Jupiter 125 आणि Suzuki Access 125 शी स्पर्धा करते. या स्कूटरवर उपलब्ध असलेल्या ऑफर्स सोबतच त्याचे इंजिन आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

काय आहे ऑफर?

नवीन Destini 125 Prime आता ग्राहकांच्या त्याच्या डिझाइन आणि फीचर्समुळे पसंत केली जात आहे. या स्कूटरची किंमत 81,599 रुपयांपासून सुरू होते. जुलै महिन्यात कंपनीने या स्कूटरवर खूप चांगली ऑफर दिली आहे. तुम्ही फक्त 8999 रुपये डाउन पेमेंट भरून ही स्कूटर घरी नेऊ शकता आणि उर्वरित पेमेंट EMI मध्ये करू शकता. या ऑफरबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही Hero MotoCorp शोरूमशी संपर्क साधू शकता.

Destini 125 Prime ची डिझाइन साधी असून कौटुंबिक ग्राहक वर्गाला आकर्षित करते. या स्कूटरमध्ये अनेक चांगले फीचर्स आहेत. यात डिजिटल ॲनालॉग स्पीडोमीटर, मोबाइल चार्जिंग पोर्ट, लांब रुंद सीट आणि बॉडी कलर मिरर, अशी सुविधा आहे. ही स्कूटर दैनंदिन वापरासाठी सर्वोत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

पॉवरफुल्ल इंजिन

Destini 125 Prime 124.6 सीसी एअर-कूल्ड, ४-स्ट्रोक, एसआय इंजिन आहे. जे 9 पीएस पॉवर आणि 10.36 एनएम टॉर्क जनरेट करते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही स्कूटर एक लिटरमध्ये 56 किलोमीटर धावते, असा कंपनीचा दावा आहे. ब्रेकिंगच्या बाबतीतही ही एक चांगली स्कूटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

SCROLL FOR NEXT