दसरा-दिवाळीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.
या गाड्यांचे आरक्षण प्रवाशांना करता येणार आहे.
सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीवर उपाय म्हणून निर्णय.
नोकरी- व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर राहणारे दसरा- दिवाळीला आपआपल्या गावी जात असतात. परंतु अनेकदा रेल्वे आणि बसेसमध्ये गर्दी असल्यानं तिकीट मिळत नाही. त्यामुळे अनेकांना गावी जाताना त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुढच्या काही दिवसांमध्ये नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी आणि छटपूजा यांसारखे महत्वाचे सण येणार आहेत. या सणासुदीच्या काळात अनेकजण आपल्या गावी जात असतात. बसेस असो की रेल्वे सर्वत प्रवाशांची गर्दी असते. त्यामुळे अनेकांना प्रवासात त्रास सहन करावा लागतो. अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते. ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. मध्य रेल्वेच्या काही प्रमुख रेल्वे स्टेशनवरून विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
नागपूर- पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूर दरम्यान विशेष एक्सप्रेस चालवली जाणार आहे. नागपूर- पुणे- नागपूर या साप्ताहिक विशेष एक्सप्रेसच्या एकूण 20 सेवा होणार आहेत. 01209 या रेल्वे गाडीची विशेष सेवा 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शनिवारी नागपूर येथून संध्याकाळी 07:40 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 10 सेवा होतील. तर, 01210 या रेल्वे गाडीची विशेष सेवा 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी पुणे येथून दुपारी 03:50 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता पोहोचेल.
या रेल्वे गाड्यांच्या एकूण 10 सेवा होतील. उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्टेशनवर थांबा मिळणार आहे. चार वातानुकूलित ३- टियर, सहा शयनयान, सहा सामान्य द्वितीय, दोन सामान्य द्वितीय आसन व्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन, अशी संपूर्ण रेल्वेचे डबे असतील.
लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस या साप्ताहिक विशेष सुपरफास्ट एक्सप्रेसच्याही एकूण 20 सेवा होणार आहेत. 02139 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री 12:25 वाजता सुटेल आणि नागपूरला त्याच दिवशी दुपारी 03:30 वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण 10 सेवा होतील. 02140 साप्ताहिक सुपरफास्ट विशेष 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक शुक्रवारी नागपूर येथून दुपारी 01:30 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 04:10 वाजता पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण 10 सेवा होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.