
भारतीय रेल्वे आता प्रवाशांसाठी सामानाची निश्चित मर्यादा लागू करणार आहे.
मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे.
हा नियम विमानांच्या सामान नियमांसारखाच असेल.
रेल्वेतील गर्दी कमी करून प्रवास अधिक सोयीस्कर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.
दररोज लाखो प्रवाशी रेल्वेतून प्रवास करत असतात. कमी पैशात प्रवास होत असल्यानं बहुतेकजण रेल्वेतून प्रवास करण्यास पसंती देत असतो. दरम्यान प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि व्यवस्थित करण्यासाठी रेल्वे सतत नवीन नियम लागू करते. नवीन सुविधा रेल्वेकडून पुरवली जात असते. आता रेल्वे आणखी एक नियम लागू करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे सर्वांना जागा मिळेल आणि रेल्वे गाड्यांवरील भार देखील कमी होईल.
यासाठी रेल्वे प्रवासात विमानांप्रमाणेच सामानाची मर्यादा लागू होणार आहे. याचाच अर्थ, जर प्रवाशांनी निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेले तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. ज्याप्रमाणे विमानतळावर सामानाचे नियम लागू आहेत, त्याचप्रमाणे हा नियम आता ट्रेनमध्येही लागू होईल. दरम्यान रेल्वेने याआधीच सामानाचे नियम बनवले होते.
परंतु ते पूर्णपणे अंमलात आणले गेले नाहीत. सध्या स्थानकांवर सामानाचे वजन तपासण्यासाठी कोणतीही मशीन नाहीत. पण आता या नियमानुसार मशीन बसवल्या जातील. दरम्यान ट्रेनच्या कोणत्या कोचमध्ये किती सामान वाहून नेले जाऊ शकते ते जाणून घेऊ.
भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या कोचसाठी सामानाची मर्यादा निश्चित केलीय. जर तुम्ही एसी फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल तर तुम्ही कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय ७० किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकता. एसी सेकंड क्लासमध्ये ही मर्यादा ५० किलो आहे. थर्ड एसी आणि स्लीपर क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी ४० किलोपर्यंत सामान वाहून नेऊ शकतात.
तर सामान्य वर्गासाठी ही मर्यादा ३५ किलो निश्चित करण्यात आलीय. जर एखाद्या प्रवाशाने निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेले तर त्याला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. या नियमाचा उद्देश हा गाड्यांवरील जास्त भार रोखणे आणि प्रत्येकासाठी पुरेशी जागा मिळेल याची सुनिश्चिता करणे आहे.
जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करताना निश्चित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन गेलात तर तुम्हाला त्यासाठी दंड किंवा अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेच्या नियमांनुसार प्रवासी त्यांच्या वर्गानुसार १० किलोपर्यंत अतिरिक्त सामान वाहून नेऊ शकतात. परंतु जर ही मर्यादा ओलांडली तर सामान बुकिंग काउंटरवरून सामान बुक करणे आवश्यक असेल. जर असे केले नाही तर दंड भरावा लागेल आणि बुकिंग शुल्क वेगळे असेल. कृपया लक्षात ठेवा की सामानाची वजन मर्यादा तपासण्यासाठी स्टेशनवर इलेक्ट्रिक लगेज मशीन बसवल्या जाणार आहेत.
भारतीय रेल्वेने सध्या लखनऊ आणि प्रयागराज विभागातील निवडक स्थानकांवर नवीन सामान नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यात प्रयागराज, प्रयागराज छेओकी, सुभेदारगंज, मिर्झापूर, बनारस, कानपूर, गोविंदपुरी, अलीगढ, तुंडला, इटावा आणि लखनौ चारबाग या प्रमुख स्थानकांचा समावेश आहे.
भारतीय रेल्वेने कोणता नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी सामानाची मर्यादा लागू करणार आहे.
या नियमामुळे काय बदल होणार?
प्रवाशांनी मर्यादेपेक्षा जास्त सामान नेल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
हा नियम का लागू केला जात आहे?
रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी हा नियम लागू होतो आहे.
हा नियम विमानप्रवासासारखा कसा आहे?
विमानांप्रमाणेच रेल्वेत आता निश्चित वजनाची मर्यादा असेल, त्यापेक्षा जास्त सामान नेल्यास शुल्क आकारले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.