Central government announces DA hike as Diwali gift for employees and pensioners. Saam tv
बिझनेस

खूशखबर! केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट; कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ, पेन्शनधारकांनाही होणार फायदा

Government Announces DA Hike : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळी भेट म्हणून जुलै २०२५ पासून महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय.

Bharat Jadhav

  • केंद्र सरकारनं कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवला.

  • हा वाढीव भत्ता जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.

  • दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला गेला.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारनं कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत खूशखबर दिलीय. सरकारनं कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करत त्यांना दिवाळी भेट दिलीय. हा महागाई भत्त्यात जुलैपासून लागू होईल. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ केलीय. ऐनसणासुदीच्या काळात हा निर्णय घेतल्यानं कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ ७ व्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना लागू असेल.

सरकारनं याआधी १ जानेवारी २०२५ पासून महागाई भत्त्यात २ टक्क्यांची वाढ केली होती. यामुळे साधरण १.१५ कोटी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांनाही फायदा मिळेल. या वाढीमुळे माहागाई भत्ता, बेसिक सॅलरीच्या ५३ टक्क्यांनी वाढून ५५ टक्के झाला होता.

कर्मचाऱ्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्याच्या भत्ता दिवाळीच्या आधी दिला जाणार आहे. याचाच अर्थ कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होईल, त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करतील. दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतमध्ये वाढ करण्याबाबत मोठी घोषणा करण्यात आलीय. यावर्षात सरकारनं दुसऱ्यांदा महागाई भत्त्यात वाढ केलीय.

पगार वाढ किती असेल?

₹३०,००० मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा अतिरिक्त ९०० रुपये मिळतील, तर ₹४०,००० पगार असलेल्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त १२०० रुपये मिळतील. तीन महिन्यांत, थकबाकीची रक्कम एकूण २७०० ते ३६०० रुपये इतकी असेल. सणासुदीच्या काळात ही एक मोठी रक्क्म असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : वीकेंडला अलिबागला ट्रिप प्लान करताय? मग 'ही' ५ ठिकाणं पाहाच

Journalist Rajiv Pratap : पत्रकाराच्या मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोस्टमॉर्टेम रिपोर्टमुळे संशय वाढला!

Shocking: आई-वडील कामावर गेले, खेळता खेळता मुलं खड्ड्यात पडली; सख्ख्या बहीण-भावाचा बुडून मृत्यू

अभिषेक शर्मानं रचला इतिहास, ICC रँकिंगमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड; कुणालाही जमलं नाही ते करून दाखवलं!

Chanakya Neeti : वैवाहिक जीवनात कटकट, चीडचीड नको; तर 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT