Central Government Saam Tv
बिझनेस

Central Government: सरकारचा मोठा निर्णय! या कर्मचाऱ्यांचा भत्ता होणार डबल; वाचा सविस्तर

Central Government Double Transport Allowance: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने आता काही कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सातव्या वेतन आयोगाच्या भत्त्यात वाढ

दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या परिवहन भत्ता झाला डबल

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता दिव्यांग श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या परिवहन भत्त्यात (Transport Allowance) वाढ केली आहे. आता हा भत्ता डबल होणार आहे. वित्त मंत्रालयाने याबाबत सर्व मंत्रालयाना आणि विभागाना निर्देश दिले आहेत.

वित्त मंत्रालयाने दिव्यांग श्रेणीतील कर्मचाऱ्यांची यादी कार्यालयीन निवेदनात अपडेट केली आहे. ही सुधारणा १५ सप्टेंबर २०२२ रोजी सूचनांमध्ये करण्यात आली आहे.

कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

अधिसूचनेनुसार, दिव्यांग व्यक्तींचे हक्क (RPwD) कायदा २०१६ आणि अपंग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभाग (EPwD) मध्ये परिभाषित केलेल्या कर्मचारी सुविधेसाठी पात्र असणार आहे.

अंधत्व असलेल्या कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे.

लोकमोटर अपंगत्व, यामध्ये सेरेब्रल पाल्सी, कुष्ठरोग बरा झालेला, बौनेपणा, अॅसिड हल्ल्याचे बळी, स्नायूंचा अंपगत्व, पाठीच्या कण्याचा आजार याचा समावेश आहे.

कर्णबधीर, मूक आणि श्रवणदोष असलेले कर्मचारी

ऑटिझम स्पेक्टॅम डिसॉर्डर, बौद्धिक अंपगत्व

दिर्घकालीन न्युरोलॉजिकल स्थिती, मल्टीपल स्क्लेरोसिस, पार्किसन्स

बहिरेपणासह अनेक अंपगत्व

सरकारचा हा निर्णय दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे.

सातव्या वेतन आयोगात मिळणार भत्ते

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगात अनेक भत्ते मिळतात. यामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता(Transport Allowance), मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षण भत्ता यांचा समावेश आहे. आठवा वेतन आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये इतर भत्त्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ankita Walawalkar: जरतारी काठ, नऊवारी थाट मोगर गजरा साजे केसात...

Leopard Rescue : दबक्या पावलाने आला अन् अडकला, कोंबड्यावर ताव मारायला आलेला बिबट्याला केलं जेरबंद, पाहा Video

Maharashtra Live News Update: कुणी कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच- मनोज जरांगे पाटील

Signs of a stroke: ब्रेन स्ट्रोक येण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' मोठे बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Bigg Boss 19 : कॅप्टन्सी टास्कमध्ये तुफान राडा; मृदुल तिवारी जखमी, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT