Cash  Yandex
बिझनेस

Cash Rule: घरात २० हजारांची कॅश ठेवताय तर कारवाई होणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Cash Rule of 20,000 Rupees: जर तुम्ही घरात २०,००० रुपये ठेवत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, याबाबत एक मेसेज व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

तुम्ही 20 हजार पेक्षा जास्त कॅश घरात ठेवत असाल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते...ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल...मात्र, असा दावा करण्यात आलाय...याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

20 हजारांची कॅश ठेवाल तर शिक्षा?

तुम्ही घरामध्ये किंवा कुणाला 20 हजार पेक्षा जास्त रक्कम देत असाल तर दुप्पट म्हणजे 100 टक्के दंड भरावा लागणार आहे...होय, असा दावा करण्यात आलाय...तुम्ही 20 हजारांची रोकड कुठून आणली...? एवढे पैसे कशासाठी आणले...? याचं जर उत्तर तुम्हाला देता आलं नाही...त्या व्यवहाराचे कागदपत्र नसतील तर कारवाई होऊ शकते असा दावा केलाय...मात्र, या दाव्यात तथ्य आहे का...? कारण, सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा हा विषय आहे...बरेच जण घरात 20 हजारांपेक्षा कॅश ठेवतात...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली...त्याआधी या व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेज

जर तुम्ही 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास अडचणीत येऊ शकता. आयकर कायदा, 1961 च्या कलम 271डीनुसार कारवाई होऊ शकते.दुप्पट रक्कम दंड म्हणून आकारली जाईल.

हा मेसेज व्हायरल होतोय...याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...याबाबत एक्सपर्ट सोप्या भाषेत माहिती देऊ शकतात...त्यामुळे आमचे प्रतिनिधी सीएंना भेटले...आणि त्यांना व्हायरल मेसेज दाखवून खरंच घरात 20 हजारांपेक्षा जास्त कॅश असेल तर आयकर विभाग दंड ठोकू शकतं का...? याबद्दल माहिती जाणून घेतली...

20 हजारांहून अधिक पैसे घरी ठेवल्यास कारवाई होऊ शकते

आयकर कायद्यातील कलम 271D मध्ये कारवाईचा उल्लेख

व्यवहाराचे कागदपत्र नसल्यास 100% दंड आकारला जाईल

छोटे व्यापारी नेहमी कर्ज घेतात देतात त्यांना सूट

बँक, UPI, पोस्ट ऑफिसमधील व्यवहार सुरक्षित

त्यामुळे तुम्हाला आता पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्यावी लागणार आहे...पैसे कसे आले हे सिद्ध न केल्यास देणाऱ्या आणि घेणाऱ्यावरही कारवाई होऊ शकते...या नियमात शेतीतून उत्पन्न मिळवणाऱ्या शेतकऱ्यांना सूट देण्यात आलीय...त्यामुळे आमच्या पडताळणीत आता 20 हजारांपेक्षा जास्त कॅश ठेवाल तर शिक्षा होणार असल्याचा दावा सत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vishal Brahma : टायगर श्रॉफसोबत काम, अरबाजला नडला; ड्रग्समध्ये अडकलेला 'तो' अभिनेता कोण?

Dussehra auspicious yog: विजयादशमीचा शुभ दिवस! या ४ राशींवर ‘शुभ योगांचा’ वर्षाव, आयुष्यात येणार मोठा बदल

Manoj Jarange : मनोज जरांगे पुन्हा फडणवीस सरकारला घेरणार, दसरा मेळाव्यात करणार मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana: ओटीपी येतोय, पण केवायसी प्रक्रिया पूर्ण होतच नाही, लाडक्या बहि‍णींपुढे नवे संकट, काय करावे?

Maharashtra Dasara Melava Live Update : देशाला आत्मनिर्भर होण्याची गरज - मोहन भागवत

SCROLL FOR NEXT