Pune Police : पुण्यात 'डब्बा कार्टेल' ! तीन महिलांचा पर्दाफाश, १.९५ किलो गांजा आणि ३० हजार रोख रक्कम जप्त
Pune Police NewsSaam Tv

Pune Police : पुण्यात 'डब्बा कार्टेल' ! तीन महिलांचा पर्दाफाश, १.९५ किलो गांजा आणि ३० हजार रोख रक्कम जप्त

Pune Police News : पुण्यातील चंदननगर परिसरात पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या महिलांचा पर्दाफाश केला आहे. या महिला एकाच घरातील असून १.९५ किलो गांजा आणि ३० हजार रुपयांची पोलिसांनी रोकड जप्त केली आहे. या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे.
Published on
Summary
  • पुण्यातील चंदननगर परिसरात पोलिसांची मोठी कारवाई

  • तीन महिला गांजाची विक्री करताना पोलिसांनी धाड टाकून पर्दाफाश केला आहे.

  • १.९५ किलो गांजा आणि ३० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

  • महिलांनी पोलिसांना गांजा विक्री केल्याची कबुली दिली आहे.

नेटफ्लिक्स वर प्रसिद्ध असलेली "डब्बा कार्टेल" सिरीज तुमच्यापैकी अनेक जणांनी पाहिली असेलच. या सिरीज मध्ये तीन महिला कशापद्धतीने अमली पदार्थांचे रॅकेट चालवतात हे दाखवलं आहे. आता अगदी या सिरीज सारखाच एक प्रकार पुण्यातून समोर आला आहे. या तिघीही एकाच घरातील असल्याची माहिती समोर आली आहे. या तिघी मिळून पुण्यात गांजाचं रॅकेट चालवत होत्या. दरम्यान पोलिसांनी यांचा पर्दाफाश केला आहे. या महिलांकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांची रोकड व १.९५ किलो गांजा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चंदननगर परिसरात काही महिला गांजाची विक्री करत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चंदनगर परिसरात धाड टाकली. आणि त्याठिकाणी छापा मारला. या तीनही महिलांच्या ताब्यातून जवळपास दोन किलो आणि तीस हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

Pune Police : पुण्यात 'डब्बा कार्टेल' ! तीन महिलांचा पर्दाफाश, १.९५ किलो गांजा आणि ३० हजार रोख रक्कम जप्त
Maharashtra Floods : अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला, ३० हजार हेक्टरवरील डाळिंब बागा उध्वस्त; शेतकऱ्यांनी फोडला टाहो

सोनाबाई पवार, सुवर्णा पवार आणि शालन जाधव अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे असून यांच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजाची विक्री करणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन महिलांना आता पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Police : पुण्यात 'डब्बा कार्टेल' ! तीन महिलांचा पर्दाफाश, १.९५ किलो गांजा आणि ३० हजार रोख रक्कम जप्त
Central Railway Mega Block : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल, कधी अन् कुठे?

पोलिसांनी या तिन्ही महिलांची कसून चौकशी केली असता त्या गांजाची विक्री करत असल्याची कबुली त्यांनी दिली. या महिलांकडून पोलिसांनी ३० हजार रुपयांची रोकड व १.९५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com