सांगोला तालुक्यात ३० हजार हेक्टरवरील डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
शेतकऱ्यांचे सुमारे १००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
निर्यातक्षम बागाही पावसात वाहून गेल्या आहेत.
शेतकऱ्यांनी सरकारकडे हेक्टरी मदत व विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
विविध देशांत सर्वाधिक डाळिंबाची निर्यात करणाऱ्या पंढरपूरच्या सांगोला तालुक्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. सर्वाधिक फटका डाळिंब शेतीला बसला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे तालुक्यातील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबा बागा उध्दवस्त झाल्या आहेत. यामध्ये विविध देशात निर्यातीसाठी तयार करण्यात आलेल्या डाळिंब बागांचाही समावेश आहे.
मागील पंधरा दिवसांपासून सांगोला परिसरात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुन्हा पावसाने झोडपून काढले. यावेळी शंभर वर्षांच्या इतिहासामध्ये कधी झाला नाही इतका एका दिवसात सुमारे १६० ते १७० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर वरील डाळिंब बागांचे मोठे नुकसान झाले. तेल्या,मर,खोडकिड या सारख्या किड रोगांचा डाळिंब बागांवर मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. हातातोंडाशी आलेला खास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे अनोनात असे नुकसान झाले आहे.
दरवर्षी सांगोल्यातून इराण,इराक,कुवेत, सौदेअरेबिया, बांग्लादेश,चीन, नेपाळ, यासह अनेक देशांमध्ये डाळिंबाची हजारो टन निर्यात केली जाते. त्यातून कोट्यावधी रुपये येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात येतात. यंदामात्र अतिवृष्टी आणि पूराने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
तालुक्यातील कडलास, सोनंद, अकोला, जवळा, मंगेवाडी या भागाला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील सुमारे ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत. यामध्ये सर्वाधिक सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील डाळीबांगाचा समावेश असून येथील शेतकऱ्यांचे सुमारे एक हजार कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने हेक्टरी एक लाख रूपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी निर्यातक्षम डाळिंब उत्पादक शेतकरी व भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी केली आहे. या संदर्भात लवकर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजसाठी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.