Mumbai Amritsar Express : मोठी दुर्घटना टळली! डहाणूजवळ एक्सप्रेसचे २ डब्बे निखळले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Mumbai News : मुंबईहून अमृतसरकडे जाणाऱ्या अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेसचे दोन डब्बे डहाणू रेल्वे स्थानकाजवळ वेगळे झाले. मुसळधार पावसामुळे आधीच रेल्वे वाहतूक विस्कळीत असताना घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
Mumbai Amritsar Express :  मोठी दुर्घटना टळली! डहाणूजवळ एक्सप्रेसचे डबे निघाले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
Mumbai Amritsar ExpressSaam Tv
Published On
Summary
  • डहाणूजवळ अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेसचे दोन डबे निघाले.

  • या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.

  • मुसळधार पावसामुळे आधीच रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरु होती.

  • सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

राज्यात एकीकडे मुसळधार पाऊस सुरु असताना दुसरीकडे मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेसचे पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकाजवळ दोन डबे निघाल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली असून अमृतसरकडे जाताना डहाणू जवळ हे दोन डबे निघाले आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालं .

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर सुपरफास्ट एक्सप्रेस ही मुंबईहून अमृतसरकडे निघाली होती. या दरम्यान या गाडीचे दोन डबे निघाले. मुंबई उपनगर ठाणे आणि पालघर या भागांमध्ये आधीच मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं त्यातच पश्चिम रेल्वेचा हा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होत.

Mumbai Amritsar Express :  मोठी दुर्घटना टळली! डहाणूजवळ एक्सप्रेसचे डबे निघाले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
Pune News : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावला, पुण्यातील भाजी विक्रेत्याने केली लाखोंची मदत

सुदैवाने या घटनेनंतर मोठी दुर्घटना टळली असली तरी याचा थेट परिणाम डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकल आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाल्याचा पाहायला मिळालं . डाऊन मार्गावरील गाड्या तब्बल ४० मिनिटं रोखण्यात आल्या. यानंतर हे डबे पुन्हा एकदा जोडून अमृतसर एक्सप्रेस गुजरातकडे रवाना करण्यात आली.

Mumbai Amritsar Express :  मोठी दुर्घटना टळली! डहाणूजवळ एक्सप्रेसचे डबे निघाले; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
Solapur Heavy Rain : सोलापूरमध्ये पावसाचा हाहाकार, बाजूच्या घराची भींत पत्र्यावर कोसळली, ३ जणांची प्रकृती गंभीर

मुंबईत काल पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, पालघरसह नवीमुंबईला रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. प्रशासनाने गरज असेल तरच घराबाहेर पडा अशी सूचना नागरिकांना दिली आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com