8th Pay Commission Saam Tv
बिझनेस

8th Pay Commission: सरकारी नोकरदारांचा पगार दणदणीत वाढणार; 8वा वेतन आयोग लवकरच, कधीपासून लागू होणार?

8th Pay Commission: केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता कॅबिनेटकडून आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

Siddhi Hande

केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कॅबिनेट बैठकीत आठव्या वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे याबाबत माहिती लवकरच समोर येईल. (8th Pay Commission)

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न विचारत होते. दरम्यान, आता लवकरच आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. कॅबिनेटने आठवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी दिली आहे.

मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिलेली आहे. यामुळे केंद्रिय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत माहिती लवकरच सांगण्यात येईल.

याआधी केंद्रिय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत होता. २०१४ मध्ये सातव्या वेतन आयोगाची घोषणा झाली होती. २०१६ मध्ये हा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो. दरम्यान, आता आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT