आपण नेहमीच आपल्या रोजच्या जीवनात स्मार्टफोनचा वापर करत असतो. स्मार्टफोन हा प्रत्येकाच्या आयुष्यात एक गरजेची वस्तू आहे. याबरोबर स्मार्टफोनमुळे आपल्या अनेक गोष्टी सोयीस्कर झाल्या आहेत. रोजच्या वापरात असलेल्या स्मार्टफोनमुळे आपण आपली सर्व कामे सहजरित्या पूर्ण करु शकतो. पण तुमचा ही स्मार्टफोन खराब झाला आहे किंवा तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करताय तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही अगदी कमी किमतीत असलेला स्मार्टफोन खरेदी करु शकता. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीये. तुम्ही कमी किमतीसह दमदार फिचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करु शकता. जाणून घेऊया कमी किमतीचे स्मार्टफोन.
आपण नेहमीच बाजारात अनेक स्मार्टफोन पाहत असतो. याबरोबर दुकानांमध्ये नवनवीन स्मार्टफोन लाँच देखील होत असतात. सणासुदीच्या वेळेला आपल्याला स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स, डिस्काउंट देखील पाहायला मिळतात. पण काही नागरिक जास्त पैसे खर्च होतील म्हणून स्मार्टफोन घेण्याचे टाळतात. अशाच नागरिकांना आम्ही १० हजारांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनची माहिती सांगणार आहोत. यामुळे ते अगदी बजेटफ्रेंडली स्मार्टफोन खरेदी करु शकता.
पोको एम ६ प्रो 5G
पोको एम ६ प्रो 5G स्मार्टफोन १० हजार ९९९ रुपयांचा आहे. हा स्मार्टफोन नागरिकांना अॅमेझॅानवर उपलब्ध होईल. पोको एम ६ प्रो 5G स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. याबरोबर फोनची बॅटरी ५००० स्टोरेजची आहे.
मोटोरोला जी ४५ 5G
मोटोरोला जी ४५ 5G हा एक उत्तम स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर ९,९९९ रुपयांपर्यत मिळेल. हा फोन अगदी स्वस्त आणि कमी किमतीत असल्याने तुम्ही खरेदी करु शकता. या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए१४ 5G
सॅमसंग गॅलेक्सी ए१४ 5G स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि सॅमसंग साईटवर उपलब्ध आहे. हा फोन तुम्हाला या दोन्ही साईटवर ९,९९९ रुपयांपर्यत मिळेल. या स्मार्टफोनमध्ये नागरिकांना ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज प्राप्त होईल. फोनच्या फिचर्सबद्दल बोलायचे तर, यामध्ये ५००० ची बॅटरी, ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आणि १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे.