Business Idea In Marathi  Saam Tv
बिझनेस

Business Tips In Marathi: स्वत:चा व्यवसाय सुरु करायचाय? महत्वाच्या ५ गोष्टी सर्वात आधी करा

Business Tips In Marathi: तुम्ही व्यवसाय करण्याचा निर्णय विचार करूनच घेतला पाहिजे. तसेच व्यवसायात तोटा टाळण्यासाठी काही महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असतं. सुरुवातीला नफा मिळालाच पाहिजे, हे देखील विसरले पाहिजे.

Vishal Gangurde

How To start Profitable Business:

सध्या नोकरदार व्यक्तीही स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असतो. एखादा व्यवसाय सुरु करणे, बोलण्या इतके सोपे नाही. त्यासाठी अथक परिश्रम आणि मेहनत घ्यावी लागते. अनेकदा व्यवसाय तोट्यात असेल तर कुटुंबातील वरिष्ठांचे टोमणेही ऐकावे लागतात. त्यामुळे व्यवसाय करण्याचा निर्णय विचार करूनच घेतला पाहिजे. तसेच व्यवसायात तोटा टाळण्यासाठी काही महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीत करणं गरजेचं असतं. (Latest Marathi News)

सुरुवातीला नफा विसरा

व्यवसाय सुरु करण्याच्या सुरुवातीलाच नफा मिळेल, याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. व्यवसाय सुरु केल्यावर सयंम राखायला हवा. व्यवसाय सुरु केल्यावर काही बाबींवर लक्ष केंद्रीत केल्यावर होणारा तोटा टाळता येऊ शकतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्यवसायाची माहिती

व्यवसाय करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला पाहिजे. व्यवसायात तुम्ही कोणतंही काम कराल, त्यातून नफा मिळवता आला पाहिजे. तसेच संबंधित व्यवसायाविषयी अधिक माहिती असायला हवी.

प्रतिस्पर्धकांवर संशोधन

एखादा युवा उद्योजक हा त्याच्या उत्पादाकावर अधिक वेळ आणि पैसा खर्च करतो. मात्र प्रतिस्पर्धकांवर जास्त संशोधन करत नाही. त्यांची माहिती मिळवत नाही.

व्यवसायाचं नियोजन

व्यवसाय सुरु करणाऱ्या व्यक्तीला चांगलं नियोजन करता यायला हवं. त्याने व्यवसायाचा रोडमॅप आधीच आखला पाहिजे. व्यवसायात फक्त नियोजन गरजेचं नसतं. तर भांडवल आणि व्यवसायात वाढ कशी होईल, याकडेही लक्ष द्यायला हवं.

बिझनेस स्ट्रक्चर निवडणे

व्यवसाय सुरु करण्याचा विचार करताना आपल्या उत्पादकामुळे लोकांच्या गरजा पूर्ण होतील, याचा विचार आधी केला पाहिजे. व्यवसाय सुरु करताना बिझनेस स्ट्रक्चर निवडणे देखील गरजेचे आहे. तुम्ही व्यवसायात लायबिलिटी कंपनी, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, सोल प्रोपायटर, कॉर्पोरेट सारखे बिझनेस स्ट्रक्चर निवडू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वसईत हिंतेद्र ठाकूर आघाडीवर

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

Maharashtra Assembly Election Result: सुरुवातीच्या कलात काँग्रेसचे 'हे' तीन दिग्गज नेते पिछाडीवर

बिग बॉस फेम अभिनेत्रीचं सौंदर्य, पाहून काळजाचा ठोका चुकला

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

SCROLL FOR NEXT