Daughter In Law Rights Over Property Of Laws Saam tv
बिझनेस

Property Rule: सासू-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा अधिकार असतो का? किती मिळते प्रॉपर्टी?

Daughter In Law Rights Over Property Of Laws: सासू आणि सासऱ्यांच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार असतो? सूनेचा तिच्या सासरच्यांच्या मालमत्तेवर अधिकार असतो का? या प्रश्नांच उत्तर तुम्हाला माहितीये का?

Bharat Jadhav

मालमत्तेमुळे वाद होत असतात. मालमत्तेच्या वादामुळे गुन्हे देखील घडतात. प्रॉपर्टीवरून वाद होऊ नये, यासाठी भारतीय संविधानात मालमत्तेबाबत अनेक प्रकारचे कायदे आणि नियम बनवण्यात आलेत. आज आपण अशा एका कायद्याबद्दल जाणून घेणार आहोत. या कायद्याबद्दल खूप कमी लोकांना माहितीये. एखाद्या सूनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांच्या मालमत्तेवर दावा करता येतो का? हा प्रश्न अनेकांना पडत असतो किंवा अनेकजण त्याबाबत विचारणा करत असतात.

सासू आणि सासऱ्यांच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार आहे, याबद्दल अनेक प्रकारचे कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकजणांना सून आणि सासू-सासऱ्याच्या प्रॉपर्टीवरून प्रश्न पडत असतो. सूनेचा तिच्या सासरच्यांच्या मालमत्तेवर अधिकार असतो का? या प्रश्नानंच उत्तर आहे नाही. सूनेला तिच्या सासू आणि सासऱ्यांनी कमावलेल्या मालमत्तेवर कोणताही कायदेशीर अधिकार नसतो. लग्नानंतर जेव्हा मुलगी तिच्या पतीच्या घरी जाते, तेव्हा तिला तिच्या सासरच्या लोकांच्या मालमत्तेवर कोणताही अधिकार किंवा दावा करता येत नसतो.

सूनेला तिच्या पतीमार्फत तिच्या सासू-सासऱ्यांच्या स्वतःच्या मालमत्तेवर अधिकार मिळतो. जर सासरच्यांना त्यांची स्वतःची मिळवलेली मालमत्ता सूनेला द्यायची असेल तर ते तसे करू शकतात. परंतु, जर सासू आणि सासरे त्यांची स्वतःची मिळवलेली मालमत्ता सुनेला देऊ इच्छित नसतील, तर सून त्या मालमत्तेवर दावा करू शकत नाही. सासू आणि सासरे त्यांची स्वतःची मिळवलेली मालमत्ता कुटुंबातील कोणत्याही सदस्याला मृत्युपत्राद्वारे देऊ शकतात.

सासू आणि सासऱ्यांनी कमावलेल्या मालमत्तेवर सुनेचा अधिकार नसतो

कायद्यानुसार, जर एखाद्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर सून त्या मालमत्तेवर दावा करू शकते. सूनेला वडिलोपार्जित मालमत्तेत फक्त दोन प्रकारे वाटा मिळू शकतो. जर तिचा पती मालमत्तेतील त्याच्या वाट्याचे हक्क तिच्या नावावर करतो, तेव्हा तिला संपत्ती वाटा मिळत असतो. याशिवाय पतीचा मृत्यू झाला तर सून वडिलोपार्जित मालमत्तेवर दावा करू शकते. मात्र सासू-सासऱ्यांनी कमावलेल्या मालमत्तेवर सून दावा करू शकत नाही.

हिंदू अविभाजित कुटुंबाशी संबंधित कायदा

कायद्यानुसार, सूनेला HUF (Hindu Undivided Family) च्या सदस्याचा दर्जा देतो, पण त्यामुळे ती सह-मालकीण होत नसते. हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, सह-मालक म्हणजे जी व्यक्ती जी केवळ हिंदू अविभाजित कुटुंबात (HUF) जन्म झाल्यामुळे त्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर कायदेशीर अधिकार प्राप्त करत असते. हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ च्या तरतुदींनुसार, HUF मध्ये जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला जन्मापासून सह-भागीदार मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT