Budget 2025 Saam Tv
बिझनेस

What is Budget: बजेट म्हणजे काय? दरवर्षी अर्थसंकल्प का सादर केला जातो? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

What is Budget Explaination: दरवर्षी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्प का सादर केला जातो? बजेट कोण तयार करतं? असे अनेक प्रश्न अनेकांना पडलेले असतात.

Siddhi Hande

अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सितारामन यांचा आठवा अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना खूप अपेक्षा आहे. करदाते, रेल्वे, शेतकऱ्यांना अर्थसंकल्पाकडून अपेक्षा आहे. अर्थसंकल्प म्हणजे काय? अर्थसंकल्प का सादर करतात? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाले आहेत. तर आज आम्ही तुम्हाला याबाबत सर्व माहिती देणार आहोत. (Budget 2025)

Budget म्हणजे काय? (What is Budget)

Budget हा शब्द फ्रेंच शब्द Bougette पासून तयार झाला आहे. म्हणजे चामड्याची पिशवी. प्राचीन काळी लोक आपली कमाई चामड्याच्या पिशवीत ठेवायची. त्यामुळेच बजेट हा शब्द वापरला जातो.

दरवर्षी अर्थसंकल्प का सादर करतात? (Why Budget Presented Every Year)

बजेट म्हणजे पुढच्या वर्षभरातील आर्थिक गोष्टींचे नियोजन. म्हणजे वर्षभरात किती कमाई होणार? कर किती घ्यायचा? कोणत्या योजनेसाठी किती निधी द्यायचा? या सर्व गोष्टींचा लेखाजोखा. या सर्व गोष्टी अर्थसंकल्पात ठेवल्या जातात. त्यानंतर पुढचे आर्थिक वर्ष तुम्हाला यानुसार काम करावे लागेल. पहिल्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतात. नंतर राज्याचा अर्थसंकल्प राज्यसभेत मांडला जातो. महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर केला जाईल.

अर्थसंकल्पाची तयारी (Who Make Budget Every Year)

अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी अर्थ मंत्रालयाकडे असते. या अर्थसंकल्पात नागरिकांसाठीच्या योजना, तरुणांसाठीचे निर्णय, शेतकरी आणि रेल्वेला या वर्षभरात काय मिळणार याबाबत घोषणा केली जाते. यातून येणारी कमाई आणि किती खर्च होणार हे सर्वकाही लेखी स्वरुपात असते. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जातो.

अर्थसंकल्प कसा तयार केला जातो?

अर्थसंकल्प तयार करण्याची तयारी ६ महिने आधीपासूनच सुरु होते. ही जबाबदारी वित्त सचिव आणि महसूल सचिव यांच्यावर असते. ते अर्थमंत्र्यांसोबत बैठका घेतात. याबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली जाते. आर्थिक सल्लागार परिषदेकडूनह सल्ला घेतला जातो. विविध संस्था, संघटना, वित्त सल्लागार यांच्याकडून सल्ले घेतले जातात. त्यानंतर अर्थसंकल्प तयार केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

Sunday Horoscope : आपलं कोण अन् परकं कोण ओळखायला शिका; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध, वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT