Rohit Sharma: 'चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवरच येणार..', रोहित शर्माने आधीच सांगितला ९ मार्च नंतरचा प्लान

Rohit Sharma News In Marathi: वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान या महोत्सवी दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. यादरम्यान रोहित शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे.
Rohit Sharma: 'चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवरच येणार..', रोहित शर्माने आधीच सांगितला ९ मार्च नंतरचा प्लान
rohit sharmatwitter
Published On

भारतीय संघाने आयसीसी टी -२० वर्ल्डकप २००७ आणि टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती. या दोन्ही स्पर्धा देशाबाहेर झाल्या पण, विजयाचं सेलिब्रेशन मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालं होतं.

रोहित शर्मा दोन्ही विजयात भारतीय संघाचा भाग होता. आधी त्याने खेळाडू म्हणून तर आता कर्णधाराची भूमिका पार पाडली. दरम्यान येत्या काही दिवसांत चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची ट्रॉफीही वानखेडे स्टेडियमवरच येणार अशी भविष्यवाणी रोहित शर्माने केली आहे.

Rohit Sharma: 'चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवरच येणार..', रोहित शर्माने आधीच सांगितला ९ मार्च नंतरचा प्लान
Wankhede Stadium: वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण! या दिवशी होणार खास सेलिब्रेशन

वानखेडे स्टेडियमला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या ऐतिहासिक क्षणी रंगारंग कार्यक्रमांचे आयोजन केले गेले होते. या सुवर्णक्षणाचा साक्षीदार होण्यासाठी रोहित शर्मा, सुनील गावसकर, रवी शास्त्री ,सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणेसह मुंबईच्या अनेक स्टार खेळाडूंनी हजेरी लावली. ही दिग्गज मंडळी स्टेजवर असताना चॅम्पियन्स ट्रॉफी सोबत फोटोशूट करण्यात आलं.

Rohit Sharma: 'चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवरच येणार..', रोहित शर्माने आधीच सांगितला ९ मार्च नंतरचा प्लान
Rohit Sharma Leaked Video : "मला सेक्रेटरीसोबत बसावं लागणार.." रोहित शर्मा-अजित आगरकर यांच्यातील संभाषण लीक

चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवरच येणार

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याबाबत बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की,' मला खात्री आहे, जेव्हा आम्ही दुबईला पोहचू तेव्हा १४० कोटी भारतीयांच्या प्रार्थना आमच्यासोबत असतील. आम्ही नक्कीच ही ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि चॅम्पियन्स ट्रॉफी वानखेडेवर आणू.'

टी -२० वर्ल्डकप विजयाच्या आठवणी सांगताना रोहित म्हणाला,' आम्ही बार्बाडोसमध्ये होतो. तिकडे वादळ आल्यामुळे आम्ही हॉटेलमध्येच बंद होतो. वर्ल्डकप जिंकण आणि त्याचं आपल्या लोकांसोबत सेलिब्रेशन करणं ही वेगळी फिलिंग आहे. खेळाडू आणि संघासोबत जल्लोष करणं वेगळी गोष्ट आहे. पण आपल्या लोकांसोबत जल्लोष साजरा करणं खूप खास आहे. लहानपणापासूनच वानखेडे स्टेडियमवर खेळणं हे माझं स्वप्न होतं.'

ज्यावेळी रोहित हे सर्व म्हणाला त्यावेळी रोहित स्टेजवरच होता. रोहितसह सचिन तेंडुलकर, रवी शास्त्री, सुनील गावसकर आणि अजिंक्य रहाणेसारखे दिग्गज खेळाडू स्टेजवर होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com