Budget 2025: शनिवार-रविवार सुट्टी; आठवड्यात फक्त ५ दिवस बँका उघडणार? बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता

Bank 5 Days Working Announcement In budget: अर्थसंकल्पीय अधिवेशनात बँक कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते. कदाचित शनिवार- रविवार बँकांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहेत.
Bank Holiday
Bank HolidayGoogle
Published On

अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला जाहीर होणार आहे. अर्थसंकल्पात अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. बँका ५ दिवस सुरु ठेवण्याची घोषणा केली जाऊ शकते. बँकांना शनिवारी आणि रविवारी सुट्टी देण्याची शक्यता आहे. याबाबत अनेक दिवसांपासून मागणी होत होती. (Budget 2025)

Bank Holiday
Budget 2025: खुशखबर! अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होऊ शकते ८ व्या वेतन आयोगाची घोषणा; ५१००० रुपये होऊ शकतो पगार

जर बँकांना शनिवार- रविवारी सुट्टी जाहीर केली तर त्यांना रोज ४० मिनिटे जास्त काम करावे लागेल. सध्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करावे लागत होते. परंतु आता सर्व शनिवारा- रविवार सुट्टी देण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

बँक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून ५ दिवस काम करण्याची मागणी करत होत होती. याबाबत कदाचित अर्थसंकल्पात घोषणा होऊ शकते.याबाबत रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. (Bank 5 days Working)

Bank Holiday
Budget 2025: आयकर भरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्थसंकल्पात कलम 80C अंतर्गत लिमिट वाढवण्याची शक्यता

मिडिया रिपोर्टनुसार, जर सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली तर बँकेत काम करण्याचा कालावधी ४० मिनिटांनी वाढेल.बँकेच्या शाखा सकाळी ९.४५ मिनिटांनी उघडतील. तर संध्याकाळी बँक ५.३० वाजता बंद होईल. रेग्युलर वेळेपेक्षा बँक १५ मिनिटे लवकरच उघडणार आणि अर्धा तास उशिरा बंद होणार.त्यामुळे हा निर्णय झाल्यावर कर्मचाऱ्यांना रोज ४० मिनिटे जास्त काम करावे लागणार आहे.

केंद्र सरकार १ फेब्रुवारीला बजेट जाहीर करणार आहे. यावेळी बँकेच्या कर्मचाऱ्यांना मोठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Bank Holiday
Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट! पीएम किसान योजनेचा निधी १०,००० होण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com