Budget 2024 Saam Tv
बिझनेस

Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! आठवा वेतन आयोग लागू झाल्यास पगारात किती वाढ होणार? वाचा

8th Pay Commission : अर्थमंत्री निर्मला सितारामन २३ जुलै रोजी देशाचे अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पान आठव्या वेतन आयोगाबाबत घोषणा केली जाऊ शकते.

Siddhi Hande

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन २३ जुलै रोजी संसदेत २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कर्मचारी वर्गासाठी कोणत्या नव्या घोषणा होऊ शकतात. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात, केंद्र सरकार आणि पेन्शनधारकांसाठी ८ वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा होऊ शकते.

केंद्र सरकारचे कर्मचारी आणि कामगार महासंघाचे सरचिटणीस एसबी यादव यांनी सरकारच्या कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून ८ व्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची मागणी केली होती. यात पेन्शनधारकांना १८ महिन्यांचा महागाई भत्ता जारी करावा आणि कोविडच्या काळात रोखून ठेवलेल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देण्यात यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

दर दहा वर्षांनी केंद्रिय वेतन आयोगाची स्थापना केली जाते. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ता तसेच सुधारणा करण्याची शिफारस करते. याआधी सातव्या वेतन आयोगाची स्थापना २८ फेब्रुवारी २०१४ रोजी झाली होती. १ जानेवारी २०२६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या. त्यानंतर आता दहा वर्षांनी १ जानेवारी २०२६ पासून ८ वा वेतन आयोग लागू झाला पाहिजे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

८ वा वेतन आयोग लागू झाल्यास फिटमेंट फॅक्टर ३.६८ पट सेट केला जाऊ शकतो. असे झाल्यास कर्मचाऱ्यांचे वेतन ८ हजार रुपयांनी वाढेल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन १८००० रुपयांवरुन १६ हजार रुपये होईल. मूळ उत्पन्न आणि महागाई भत्त्यात जवळपास २५ ते ३५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. सातव्या वेतन आयोगा २.५७ फिटमेंट लागू करण्यात आला होता. फिटमेंट फॅक्टरनुसार केंद्रिय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन ठरवले जाते. त्यात वाढ झाल्यावर कर्मचाऱ्यांचे वेतन वाढते.

२०२४-२५ चा केंद्रिय अर्थसंकल्प निर्मला सितारामन संसदेत सादर करणार आहेत. निर्मला सितारामन सलग सातवा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule : पोर्शे गाडी प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

SCROLL FOR NEXT