BSNL Broadband Plans Times of India
बिझनेस

BSNLने आणला तगडा प्लान; 3 महिने भेटेल हाई स्पीड 3600GB डेटा, जिओ-एअरटेलचं वाढवलं टेन्शन

BSNL Broadband Plans: BSNL ने नवा प्लान आणलाय. या प्लानमध्ये Jio आणि Airtel चं टेन्शन वाढणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला हाय स्पीड 3600GB डेटा मिळणार आहे.

Bharat Jadhav

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL एकामागून एक नवीन ऑफर्स सादर आणत आहे. नेटवर्क कव्हरेज सुधारण्यासाठी कंपनीने अलीकडेच 51,000 नवीन 4G मोबाइल टॉवर स्थापित केले आहेत. यामुळे युझर्सला चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. दरम्यान कंपनीने एक नवीन ब्रॉडबँड प्लान आणला आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 महिन्यांसाठी हाय स्पीड 3600GB डेटा मिळत आहे. चला जाणून घेऊया या खास प्लानबद्दल.

BSNL चा 999 रुपयांचा नवीन ब्रॉडबँड प्लॅन

BSNL ने इंटरनेट युझर्संसाठी एक खास प्लान लाँच केला आहे. या प्लानची ​​किंमत 999 रुपये आहे. यात तुम्हाला तीन महिन्यांसाठी हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळेल. प्लॅनमध्ये दरमहा एकूण 3600 GB म्हणजेच 1200 GB डेटा मिळणार आहे. प्लानमध्ये तुम्हाला 25 Mbps पर्यंत इंटरनेट स्पीड देखील मिळेल. तर अतिरिक्त फायदा म्हणजे प्लानमध्ये अमर्यादित कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध असणार आहे.

X वर पोस्ट करताना कंपनीने सांगितले की जर तुम्ही 1200 GB डेटा वापरत असाल तर स्पीड 4Mbps पर्यंत कमी होईल. परंतु असे असूनही तुमचे इंटरनेट कनेक्शन अमर्यादित राहील. कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या प्लानची घोषणा केली आहे. तुम्ही बीएसएनएल वेबसाइट, सेल्फ-केअर ॲप किंवा हेल्पलाइन नंबर 1800-4444 वर कॉल करून ते सक्रिय करू शकता.

बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन खास का आहे?

जर तुम्ही खूप डेटा वापरत असाल तर हा ब्रॉडबँड प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो. प्लानमध्ये कॉलिंग सुविधा देखील उपलब्ध आहे. यामुळे हा प्लॅन आकर्षक बनतो. तसेच 25 Mbps पर्यंत इंटरनेटचा वेग थोडा कमी आहे, कारण खासगी दूरसंचार कंपन्या किमान 30Mbps पर्यंत इंटरनेट गती देतात.

जर तुम्ही BSNL चे प्रीपेड युझर असाल तर तुम्ही 2399 रुपयांचा प्लान देखील खरेदी करू शकतात. यात 395 दिवसांची दीर्घ वैधता उपलब्ध आहे. इतकेच नाही तर या प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही उपलब्ध आहे. प्लानमध्ये तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधाही मिळत आहे. कंपनी प्लानमध्ये 790GB हाय स्पीड डेटा देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT