Bounce Infinity E1+ E-Scooter Price Drops Saam Tv
बिझनेस

Ola नंतर आता 'या' कंपनीने Electric Scooter च्या किंमतीत केली मोठी कपात; ग्राहकांना होणार मोठा फायदा

Satish Kengar

Bounce Infinity E1+ E-Scooter Price Drops:

अनेक कंपन्या त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री वाढवण्यासाठी भरघोस सूट देत आहेत. या यादीत एकामागून एक नवीन नावे जोडली जात आहेत. याआधी ओलाने व्हॅलेंटाइन डे ऑफर सुरू केली होती. तर iVooMe ने देखील आपल्या ई-वाहनावर 31 मार्चपर्यंत ऑफर आणली आहे.

यातच आता बेंगळुरू येथील ईव्ही (EV) उत्पादक कंपनी बाऊन्स इन्फिनिटीही आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरवर मोठी सूट जाहीर केली आहे. कंपनीने आपल्या Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 24,000 रुपयांनी कमी केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या कपातीनंतर इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन एक्स-शोरूम किंमत 113,000 रुपयांवरून 89,999 रुपयांवर आली आहे. याच्या नवीन किमतीही तत्काळ प्रभावाने लागू झाल्या आहेत. इन्फिनिटी E1+ इलेक्ट्रिक स्कूटरवरील ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत वैध असेल. (Latest Marathi News)

Bounce Infinity E1+ इलेक्ट्रिक स्कूटरला 2.2kW ची इलेक्ट्रिक मोटर मिळते. जी 65 kmph चा टॉप स्पीड देते. स्कूटर 2kWh लिथियम-आयन NMC बॅटरी पॅकसह येते. जी एका चार्जवर 85 किमी पेक्षा जास्त IDC रेंज देते. E1+ इलेक्ट्रिक स्कूटरच्या पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस ट्विन स्प्रिंग शॉक देण्यात आले आहेत.

देशभरात आहे 70 पेक्षा जास्त डीलरशिप

दरम्यान, कंपनीचे देशभरात 70 पेक्षा जास्त डीलरशिप आहेत. यातच कंपनीने आपल्या स्कूटरची किंमत कमी केल्याने ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत आहे. याचबद्दल बोलताना बाउंस इन्फिनिटीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि सह-संस्थापक अनिल म्हणाले की, ही महत्त्वपूर्ण किंमत कपात आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आमचे समर्पण दर्शवते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT