Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: बोअरवेलसाठी सरकारकडून मदतीचा हात! शेतकऱ्यांना मिळणार ५० हजारांचे अनुदान

Boarwell Anudan Scheme: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना बोअरवेलसाठी अनुदान दिले जाते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. शेतीसाठी अनेक गोष्टी आवश्यक असतात. अनेकदा शेतीसंबंधित अवजारे, ट्रॅक्टर या गोष्टी घेण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. राज्य सरकारने अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना बोअरवेल खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.

या योजनेतून शेतकऱ्यांना नवीन विहीर, बोअरिंग, शेततळ्यांसाठी प्लास्टिक पन्नी, सिंचन, विहीर दुरुस्ती आणि बोअरलवेल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. यासाठी ५० हजार रुपये दिले जाते. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावे. यामधून त्यांचे चांगले पीक यावे या उद्देशातून हे अनुदान दिले जाते.

शेतीतील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे. बोअरवेल बसवल्यानंतर शेतात पाण्याची सुविधा केली जाते. या योजनेचा लाभ अनुसूचित जमतीतील लोकांनी घ्यायचा आहे.

अटी काय?

या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी महाराष्ट्राचा असावा.

शेतकरी अनुसूचित जमातीतील असावा. उमेदवाराकडे स्वतः चा दाखला असावा.

याचसोबत अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असावे. त्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखलादेखील असावा.

याचसोबत या शेतकऱ्याच्या नावावार जमिनीचा सातबारा असायला हवा. अर्जदाराकडे ०.४० हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.

अर्ज कुठे अन् कसा करायचा?

तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी या वेबसाइटवर जायचे आहे. तिथे शेतकरी योजना हा ऑप्शन निवडायचा आहे. यानंतर तुम्हाला बिरसा मुंडा कषी क्रांती योजना हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा अन् अर्ज भरा.

कागदपत्रे

आधारकार्ड, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतीचा सातबारा, स्टॅम्प पेपवर प्रतिज्ञापत्र, शेती असल्याचा दाखला, शेतात कोणतीही विहीर नसल्याचा पुरावा, जागेचा फाटो, ग्रामसभेचा ठराव ही कागदपत्रे आवश्यक आहेत. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Maharashtra Live News Update: मनसेच्या दिपोत्सवाला जाताना ठाकरे बंधूंचा एकाच कारमधून प्रवास

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

Saturday Horoscope: धनत्रयोदशीला 4 राशींचे भाग्य उजळणार, कामाच्या ठिकाणी बढतीचे योग, वाचा शनिवारचे राशीभविष्य

धक्कादायक! आणखी एका पोलीस कर्मचाऱ्यानं आयुष्य संपवलं, १० दिवसात ३ पोलिसांची आत्महत्या

SCROLL FOR NEXT