Simpl Company Layoff Saam Tv
बिझनेस

Simpl Company Layoff: नोकर कपातीचे संकट कायम; ई-कॉमर्स कंपनीची दोन महिन्यात शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ दिला

Simpl Company Layoff Employees: सिंपल या स्टार्टअप कंपनीने गेल्या दोन महिन्याच्या आत दोनदा कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीने आतापर्यंत जवळपास १६० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिम्पल या स्टार्टअप कंपनीने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. कंपनीने गुरुवारी सुमारे ३० कर्मचाऱ्यांनी पिंक कलरच्या स्लिप् स दिल्या आहे. कंपनीने २ महिन्याच्या आताच १६० लोकांना कामावरुन काढून टाकले आहे. यामुळे कंपनीच्या सर्व विभागातील लोकांवर परिणाम झाला आहे.

ज्या व्यक्तीला कामावरुन काढून टाकले त्यापैकी एकाने बिझनेस स्टँडर्डला माहिती दिली आहे. 'आम्हाला लेऑफच्या मीटिंगमध्ये ही माहिती दिली. काही वरिष्ठांनी आम्हाला कंपनी सोडण्यास सांगितले. कंपनीच्या काही वरिष्ठ व्यक्तींनीही कंपनीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या कामावर खूप मोठा परिणाम झाला आहे',असं त्यांनी सांगितले.

त्या व्यक्तीने सांगितले की, कंपनीने आम्हाला चांगले पॅकेज देण्याचे आश्वासन दिले होते. त्यात दोन महिन्यांचा पगार समाविष्ट होते. कंपनीने अनेक लोकांना कामावर घेतले आहे. परंतु कंपनी लवकरच या लोकांनाही कामावरुन काढून टाकेल, याची मला खात्री आहे. याआधी कंपनीने सुमारे १६० कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीचा विकास करण्यासाठी आणि प्रॉफिटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे आम्हाला सांगण्यात आले.

याबाबत कंपनीने बिझनेस स्टँडर्डला माहिती दिली आहे. कामात वेग आणण्यासाठी, सर्वांच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी म्हणजेच कंपनीला मोठा नफा मिळवून देण्यासाठी हे पाऊल असलल्याचे कंपनीने सांगितले.

गेल्या काही वर्षांमध्ये आमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरु आहे. तो तसाच सुरु ठेवण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी काही उपाययोजना हाती घेत आहोत, असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

एका अहवालात, मार्च आणि एप्रिलमध्येदेखील सिम्पल कंपनीने कर्मचाऱ्यांच्या रिव्हिवनंतर त्यांना काढून टाकले होते. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याची ही तिसरी फेरी होईल. परंतु कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT