Google Layoffs : गुगलकडून पुन्हा एकदा कर्मचारी कपात; क्लाउडच्या १०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या

Google Layoffs : कंपनीतल्या क्लाउड टिममधील तब्बल १०० कर्मचाऱ्यांना कमी केले आहेत. सीएनबीसीने याबाबत बातमी दिली आहे. सीएनबीसीने याबाबत बातमी दिली आहे.
Google Layoffs
Google India Layoffs 2024 Saam Tv

गुगल कंपनीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या कंपनीत नोकरी मिळावी असं स्वप्न अनेक तरुण पाहतात. मात्र आता येथे मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. कंपनीतल्या क्लाउड टिममधील तब्बल १०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले आहे. सीएनबीसीने याबाबत बातमी दिलीये.

Google Layoffs
Grampanchayat Employees Strike : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद; भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सहभाग

गुगलचे प्रवक्ता यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, आम्ही कंपनीचा विकास तसेच ग्राहकांची प्राथमिकता नेमकी काय आहे हे जाणून घेऊ आणि त्यानुसार काम करू. त्यासाठी विकासाच्या दृष्टीने काम करण्याची आमची पूर्ण तयारी आहे. व्यवसायाच्या या स्पर्धेत दिर्घकाळ यशाच्या शिखरावर टिकून राहण्यासाठी आम्ही स्वत:ला तेवढे परिपूर्ण बनवत आहोत.

खर्चावर उपाय शोधत आहे

गुगल कंपनी सध्या आपल्या कंपनीतील खर्च कमी कसा होईल याकडे जास्त लक्ष देत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देखील कंपनीने एप्रिलमध्ये काही कर्मचाऱ्यांना कमी केलं होतं. त्यामुळे जास्तीचा खर्च काही प्रमाणात कमी करण्यास मदत झाली.

जानेवारीतही कर्मचारी कपात

गुगल कंपनीने जानेवारी महिन्यात देखील अनेक कर्चचाऱ्यांना कमी केले होते. यामध्ये इंजिनीअरिंग, हार्डवेअर आणि सपोर्ट टीमचा देखील समावेश होता. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑफर करण्यासाठी गुंतवणूक वाढवली होती, त्यामुळे त्यांनी काही कर्मचारी कपात केले होते.

गेल्यावर्षी १२ हजार कर्मचारी कपात

गुगलने गेल्यावर्षी सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. टेक कंपन्या २०२२ पासून कर्मचारी कपात करत आहेत. गेल्या वर्षीही जगभरातील टेक कंपन्यांनी लाखो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचे समजले आहे.

Google Layoffs
Bank Employees News: बँक कर्मचाऱ्यांना १७ टक्के पगारवाढ, फक्त ५ दिवस करायचं काम; करारावर अंतिम स्वाक्षऱ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com