Grampanchayat Employees Strike : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद; भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सहभाग

Bhandara News : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेनेच्यावतीने आजपासून काम बंद संप पुकारला आहे.
Grampanchayat Employees Strike
Grampanchayat Employees StrikeSaam tv
Published On

शुभम देशमुख 
भंडारा
: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या प्रलंबित आहेत. यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. यात (Bhandara) भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरु केले असून जिल्हातील ५४१ ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. (Latest Marathi News)

Grampanchayat Employees Strike
Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; सरपंचासह सदस्यांना कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

ग्रामपंचायत (Grampanchayat) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेनेच्यावतीने आजपासून काम बंद संप पुकारला आहे. पालिका व जिल्हा परिषद (Zilha Parishad) कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, अनुदान देणे, निवृत्ती वेतनाची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानासाठी लादलेली वसुलीची अट पूर्णपणे रद्द करण्यात यावी. ऑगस्ट २०२० ते मार्च २०२२ पर्यंतची पगाराची थकबाकी त्वरित देण्यात यावी. या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने हे काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Grampanchayat Employees Strike
Chandwad Crime : चोरट्यानी ३ दुकाने फोडत लाखोंचा मुद्देमाल केला लंपास

भंडारा जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीतील कर्मचारी सहभाग नोंदवला. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा, कर वसुली, साफसफाई, दाखले आदी कामे बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे काही ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये आलेल्या ग्रामस्थांना माघारी फिरावे लागले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com