Facebook-Instagram Saam Tv
बिझनेस

Facebook-Instagram: फेसबुक-इन्स्टासाठी पैसे मोजावे लागणार? सोशल मीडिया यूजर्सना मोठा धक्का

Facebook-Instagram Free No More: मेटा कंपनी फेसबुक-इन्स्टाग्रामसाठी पेड प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लसची किंमत सुमारे ३८७ रुपये असू शकते अशी माहिती समोर आली आहे.

Priya More
  • मेटा कंपनी फेसबुक-इन्स्टाग्रामसाठी पेड प्लॅन आणण्याच्या तयारीत

  • फेसबुक आणि इंस्टाग्राम प्लसची किंमत सुमारे ३८७ रुपये असू शकते

  • व्हॉट्सअॅप प्लससाठी अंदाजे २९० रुपये शुल्क लागू शकते

  • पेड युजर्सना प्रीमियम फीचर्स आणि खास टूल्स मिळणार

शामल भंडारे, साम टीव्ही

तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम आणि वॉट्सअॅप वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी सर्वात मोठा झटका ठरू शकते. कारण यापुढे सोशल मीडिया वापरण्यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. मेटा कंपनीचा नेमका काय प्लॅन आहे? तुमच्या खिशाला कशी कात्री लागणारे ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

सकाळचे डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत. आपण सगळेच सोशल मीडियाच्या जगात बुडालेले असतो. फेसबुक आणि इंस्टाग्राम हे आपल्या आयुष्याचा जणू भागच बनलेत. आता हेच फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणं मोफत राहणार नसल्याची चर्चा रंगली आहे. यासाठी तुम्हाला दरमहा पैसे मोजावे लागू शकतात. कारण मेटा कंपनीने आता 'पेड सबस्क्रिप्शन प्लॅन' आणण्याची मोठी घोषणा केली आहे.

आवडत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. कारण,मेटा कंपनी आता आपल्या सगळ्याच लोकप्रिय अँप्सचे 'प्लस' व्हर्जन लॉन्च करत आहे. यामध्ये पैसे देणाऱ्या युजर्सना काही खास टूल्स आणि कस्टमायझेशन फीचर्स मिळतील. मात्र जे युसर्ज मोफत व्हर्जन वापरत आहेत, त्यांना खास कस्टमायिझ फीचर्स मिळणार नाहीत. त्यामुळे प्लस व्हर्जनसाठी युसर्जंना किती खर्च करावा लागणार आहे.

फेसबुक-इंस्टासाठी पैसे मोजावे लागणार?

* इंस्टाग्राम प्लस: सुमारे 387 रुपये महिना

* फेसबुक प्लस: सुमारे 387 रुपये महिना

* वॉट्स अप प्लस: सुमारे 290 रुपये महिना

'इंस्टाग्राम प्लस' आणि 'फेसबुक प्लस'साठी युजर्सना दरमहा ३.९९ डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ३८७ रुपये मोजावे लागतील. तर 'वॉट्सॲप प्लस'साठी दरमहा २.९९ डॉलर्स म्हणजे सुमारे २९० रुपये द्यावे लागतील. दरम्यान, मेटाने अद्याप भारतासाठीच्या अधिकृत किंमती जाहीर केल्या नसून, त्या लवकरच समोर येतील.

मेटाचा हा संपूर्ण प्लॅन कंपनीचा महसूल वाढवण्यासाठी आहे. या निर्णयावरून स्पष्ट होतंय की, कंपनीला आता कमाईसाठी फक्त जाहिरातींवर अवलंबून राहायचं नाहीये. युजर्सना प्रीमियम फीचर्स, उत्तम अनुभव आणि जास्त ऑडियन्स रीच देऊन, त्याबदल्यात दरमहा पैसे कमावण्याचं कंपनीचं उद्दीष्ट आहे. आता भारतीय युजर्स पैसे मोजण्यासाठी तयार होतील का? 'प्लस व्हर्जन'ला भारतात कसा प्रतिसाद मिळतोय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Curd: पावसाळ्यात घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं?

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT