
Meta कंपनीने नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच Facebook Messenger App बंद होणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. त्यामुळे लाखो मेसेंजर युजर्सवर परिणाम होणार आहे. कंपनीने युजर्सना याबाबत नोटिफिकेशनद्वारे अलर्ट करण्यास सुरुवात केली आहे. मेटाने स्पष्ट केले आहे की पुढील ६० दिवसांत हा अॅप पूर्णपणे बंद होणार आहे. त्यानंतर युजर्स फेसबुकच्या अधिकृत वेबसाइट किंवा Messenger.com मेसेंजरचा वापर करू शकतील. त्यामुळे मोबाइल किंवा डेस्कटॉपवरील अॅप वापरता येणार नाही.
मेटाने टेक क्रंचला दिलेल्या माहितीनुसार, 15 डिसेंबर 2025 पासून विंनोडज आणि मॅकसाठी असलेला मेसेंजर डेक्सस्टॉप App बंद केला जाणार आहे. या तारखेनंतर युजर्सना अॅपमध्ये लॉगिन करता येणार नाही. जर तुम्ही लॉगिन करण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला थेट फेसबुक वेबसाइटवर रीडायरेक्ट केले जाईल. त्यामुळे 15 डिसेंबरनंतर मेसेंजर डेक्सस्टॉप App अनइंस्टॉल करण्याचा सल्ला दिला गेला आहे. कारण अॅप यानंतर चालू राहणार नाही. या डेस्कटॉप अॅप्स बंद करण्याच्या योजनेची माहिती सर्वात आधी AppleInsider या वेबसाइटने दिली होती.
मेसेंजर चॅट्स बद्दल काय?
अनेक युजर्सना प्रश्न पडला आहे की, अॅप बंद झाल्यावर त्यांच्या चॅट हिस्ट्रीचं काय होणार? मेटाच्या म्हणण्यानुसार, तुमची चॅट हिस्ट्री सुरक्षित राहील, परंतु त्यासाठी तुमच्या अॅपमध्ये सिक्योर स्टोरेज फीचर ऑन असणे आवश्यक आहे. हे फीचर तुमच्या Encrypted Chats सर्व डिव्हाइसेसवर सेव आणि सिंक करण्यास मदत करते.
मेसेंजर चॅट्स हे फीचर ऑन आहे की नाही हे तपासण्यासाठी अॅपच्या सेटिंग्ज प्रायव्हसी आणि सेफ्टी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅट मेसेज स्टोरेज ऑप्शन अॅक्टिव आहे की नाही हे तपासा. Meta च्या या निर्णयामुळे डेस्कटॉपवरून मेसेंजर वापरणाऱ्यांना आता वेबसाइट किंवा मोबाइल ब्राउझरचा वापर करावा लागणार आहे. मात्र, सध्याच्या चॅट्स गमावू नयेत म्हणून सेटिंग्समध्ये बदल करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.