

सध्या लोक बोलणं कमी आणि पाहणं जास्त पसंत करतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सगळेच स्क्रोलिंग करत असतात. यासाठी सगळ्यात जास्त वापरलं जाणारं अॅप म्हणजे Instagram. पण आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. Meta कंपनीने ८ मे २०२६ पासून Instagram Direct Messages (DMs) मधले end-to-end encryption हे फिटर डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे त्यातले प्रायव्हेट चॅट आधीसारखे पूर्णपणे प्रायव्हेट राहणार नाहीत. यासंबंधीत मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.
Meta ने २०२३ मध्ये इन्स्टामधलं DMs साठी end-to-end encryption हे फीचर सुरु केलं होतं. याचा फायदा फक्त मेसेज पाठवणारा आणि प्राप्त करणारा व्यक्तीचं चॅट वाचू शकत होता. तिसऱ्या व्यक्तीला किंवा प्लॅटफॉर्मलाही त्या मेसेजपर्यंत थेट प्रवेश मिळत नव्हता. पण आता हेच संरक्षण काढून टाकण्याचा निर्णय काही समस्यांमुळे घेण्यात आला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, हा बदल युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आला आहे. यामध्ये child sexual abuse material (CSAM), grooming, harassment आणि बेकायदेशीर कंटेंट शोधण्यासाठी प्लॅटफॉर्मला जास्त प्रभावी मॉनिटरिंग करता येणार आहे. जागतिक स्तरावर अनेक सरकारांकडून टेक कंपन्यांवर ऑनलाइन सुरक्षेबाबत दबाव वाढत असल्याने Meta ने हा निर्णय घेतला आहे.
Meta ने सध्या हा बदल फक्त Instagram साठीच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. WhatsApp किंवा Facebook Messenger वरही भविष्यात असे बदल होणार का, याबद्दल कंपनीने अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. तसेच ऑनलाइन सुरक्षेचे नियम जास्त कडक होत असताना भविष्यात सोशल मीडिया कंपन्यांच्या privacy policies मध्ये आणखी मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.