Sakshi Sunil Jadhav
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हे कोकणातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गावात पर्यटकांना बोटीमधून कांदळवन सफरीचा अनुभव घेता येतो. हिरव्यागार झाडांमधून जाणारी ही सफर मनाला शांतता देणारी ठरते.
अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेले श्रीवर्धन हे निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते.
लांब आणि रुंद समुद्रकिनारा, स्वच्छ वाळू आणि शांत वातावरण हे श्रीवर्धन बीचचे वैशिष्ट्य आहे. येथे सूर्यास्ताचे दृश्य पाहणे म्हणजे अविस्मरणीय अनुभव असतो.
बीचवर घोडेस्वारी, बग्गी राईड आणि समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्याचा आनंद घेता येतो.
ताजे मासे, बोंबील, सुरमई, पापलेट, बांगडा, तारली आणि कोळंबी यांसारख्या स्वादिष्ट सीफूड पदार्थांची चव येथे चाखायला मिळते.
कोकणातील पारंपरिक उकडीचे मोदक हे श्रीवर्धनमधील खास आकर्षण मानले जाते.
श्रीवर्धन हे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान आहे. तसेच हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे.
हरिहरेश्वर, आरवी बीच आणि अरवी परिसरातील निसर्गसौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. एका ट्रिपमध्ये अनेक ठिकाणांचा आनंद घेता येतो.
श्रीवर्धनला रेल्वे आणि बसने सहज पोहोचता येते. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव असून तेथून सुमारे ४५ किमी अंतरावर श्रीवर्धन आहे. मुंबईपासून १८२ किमी, पुण्यापासून १६२ किमी आणि अलिबागपासून ११७ किमी अंतरावर हे पर्यटनस्थळ आहे.