पंतप्रधान मोदींनी जीएसटी सुधारणा होणार असल्याचे संकेत दिले.
१२% आणि २८% जीएसटी स्लॅब रद्द करून फक्त दोन स्लॅब ठेवण्याची शक्यता.
दैनंदिन गरजेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स आणि औषधे स्वस्त होणार.
तंबाखू, दारू आणि ऑनलाइन सट्टेबाजीवर विशेष ४०% कर लागू होऊ शकतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जीएसटी सुधारणांबाबत संकेत दिले. दिवाळीमध्ये कराचा बोजा लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जीएसटी कररचनेत मोठे सुधार होणार हे निश्चित झाले. काही स्लॅब रद्द केले जाऊ शकतात, किंवा काही वस्तू दुसऱ्या स्लॅबमध्ये टाकल्या जाण्याची शक्यता आहे. या सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, जीएसटीचे दोन स्लॅब रद्द करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत, यापुढे फक्त दोनच स्लॅब राहू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, १२ आणि २८ टक्के जीएसटीचा स्लॅब रद्द करण्यात येणार आहे.
केंद्र सरकार जीएसटीमध्ये मोठी सुधारणा करण्यावर काम करत आहे. १२ टक्केंचा जीएसटी स्लॅब रद्द केला जाईल, त्यामधील वस्तू या ५ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये जातील. तर २८ टक्क्यांच्या स्लॅबमधील वस्तू या १८ टक्के स्लॅबमध्ये जातील. यावर केंद्र सरकार काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे. स्लॅब रद्द केल्यास अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.
जीएसटीमध्ये फक्त दोनच स्लॅब ठेवण्यासोबतच विशेष कराचाही विचार सरकारकडून करण्यात येत आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, तंबाखू, दारू, पान मसाला आणि ऑनलाइन सट्टेबाजी यासारख्या उत्पादनांवर सरकार ४० टक्के विशेष कर लावण्याच्या तयारीत आहे. १२ टक्के स्लॅबमधील ९९ % उत्पादने ५ % स्लॅबमध्ये हलवण्यात येणार आहेत, तर २८ % स्लॅबमधील ९०% उत्पादने १८% स्लॅबमध्ये हलवण्याचा प्रस्ताव आहे.
केंद्र सरकारला सध्या सर्वाधिक कर १८ टक्के जीएसटी स्लॅबमधून मिळतो. एकूण महसूलमधील ६५ टक्के कर हा १८ टक्के स्लॅबमधून मिळतो. तर २८ टक्के स्लॅबमधून केंद्र सरकारला ११ टक्के कर मिळतो. तर १२ टक्के स्लॅबमधून केंद्र सरकारला ५ टक्के महसूल मिळतो. दैनंदिन गरजेच्या वस्तूंवर लागणाऱ्या ५ % या सर्वात कमी कर स्लॅबमधून केंद्र सरकारच्या एकूण जीएसटी कमाईचा ७% महसूल मिळतो. पण आता १२ टक्के अथवा १८ टक्के कर लागणाऱ्या वस्तू ५ टक्के स्लॅबमध्ये घेण्याचा सरकार विचार करत आहेत. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार असून दैनंदिन वस्तू आणखी स्वस्त होणार आहेत. यामध्ये स्नॅक्स, पॅक केलेल्या वस्तू आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.
कोण कोणत्या वस्तू आणखी स्वस्त होणार, वाचा संपूर्ण यादी...
दंतमंजन
केसांचे तेल
साबण (सर्व प्रकार)
टूथपेस्ट (काही ब्रँडेड प्रकार)
छत्र्या
मोबाइल
प्रक्रिया केलेले अन्न
संगणक (Computers)
शिलाई मशीन
पाणी गाळणी आणि शुद्धीकरण यंत्रे (गैर-विद्युत प्रकार)
प्रेशर कूकर
इलेक्ट्रिक इस्त्री
गिझर
व्हॅक्यूम क्लिनर (कमी क्षमता, गैर-व्यावसायिक)
रेडिमेड कपडे (किंमत १,००० रुपयांपेक्षा जास्त)
चपला (५०० ते १,००० रुपये किंमतीच्या श्रेणीत)
लसी
एचआयव्ही, हिपॅटायटिस, क्षयरोग निदान किट
काही आयुर्वेदिक आणि युनानी औषधे
नकाशे
अॅल्युमिनियम, स्टीलची स्वयंपाकाची भांडी
सायकल
केरोसीन नसलेले स्टोव्ह
ग्लेझ्ड टाइल्स
व्हेंडिंग मशीन
कंडेन्स्ड दूध, गोठवलेल्या भाज्या यासारखे पॅकेज्ड खाद्यपदार्थ (काही प्रकार)
सौर पाणी तापवण्याचे यंत्र
यंदाच्या दिवाळीपासून जीएसटी सुधारणेनंतर 18% आणि 28% कर लागणाऱ्या वस्तू स्वस्त होऊ शकतात.
विमा - 18% वरून 5% आणि काही प्रकरणांमध्ये - शून्य असू शकतो.
सिमेंट
रेडी-मिक्स कॉंक्रिट
एअर-कंडिशनर
टेलिव्हिजन
रेफ्रिजरेटर
वॉशिंग मशीन
कार आणि मोटरसायकलच्या सीट्स (काही प्रकारांना वेगळे दर लागू शकतात)
रेल्वेसाठी रूफ-माउंटेड पॅकेज युनिट एअर-कंडिशनिंग मशीन
एरेटेड वॉटर
डिशवॉशर
प्रोटीन कॉन्सन्ट्रेट्स, साखर सिरप, कॉफी अरोमा, कॉफी कॉन्सन्ट्रेट्स**
डेंटल फ्लॉस
व्यावसायिक प्लास्टिक उत्पादने
रबर टायर्स (सायकल आणि कृषी वाहनांसाठी कमी कर)
प्लास्टर
टेम्पर्ड ग्लास
अॅल्युमिनियम फॉइल
रेझर्स
मॅनिक्युअर/पेडिक्युअर किट्स
प्रिंटर्स
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.